AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या कंडक्टरच्या हाती प्रवाशांच्या जीवाची दोरी, थोडी जरी कमी जास्त खेचली तर…

विठ्ठलवाडी आगारातून सकाळी सात वाजता अमळनेरसाठी एसटी सुटली. कसारा घाटात येताच एसटीच्या एक्सिलेटरचा पेडल तुटला. मग पुढे नाशिकपर्यंतचा भयानक प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

एसटीच्या कंडक्टरच्या हाती प्रवाशांच्या जीवाची दोरी, थोडी जरी कमी जास्त खेचली तर...
विठ्ठलवाडी-अमळनेर एसटीचा जीवघेणा प्रवासImage Credit source: TV9
| Updated on: Apr 20, 2023 | 7:16 PM
Share

कल्याण / सुनील जाधव : विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने एसटी बस निघाली. मात्र कसारा घाटात एसटीच्या एक्सलेटरच पेडल तुटला. यानंतर एसटी चालक आणि कंडक्टरने जी शक्कल लढवली ती पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. अखेर दोरीचा वापर करत बस नाशिकला पोहचली. चालक गाडी चालवत होता तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये देखील ती बस दुरुस्त केली गेली नाही. त्यात चालक आणि कंडक्टरची तरी काय चूक, बस दुरुस्त केल्या जात नसतील तर एसटी डेपो आहेत तरी कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये चालक गाडी चालवत आहे, तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा संताप अधिक विकोपाला गेला. नागरिकांनी गोंधळ घालत धावत्या बसमधली ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला चालली होती बस

कल्याण नजीक असलेल्या विठ्ठलवाडी आगारातून गुरुवारी सकाळी सात वाजता अमळनेरच्या दिशेने राज्य परिवहन मंडळाची एसटी निघाली. कसारा घाटात एसटी येताच एक्सिलेटरचं पेडल तुटलं. बसमध्ये प्रवासी होते. मग वेळेला करणार तरी काय?, त्यामुळे दोरीच्या सहाय्याने गाडी कंट्रोल करण्यात आली. नाशिकपर्यंत चालक अशाच स्थितीत गाडी चालवत होता.

नाशिकमध्ये बस दुरुस्त करण्याचा निष्फळ प्रयत्न केला

नाशिकला पोहचताच मेकॅनिककडून बस दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न केला गेला, पण बस दुरुस्त झाली नाही. मग इथून दुसरी बस उपलब्ध करून देण्यासाठी कंडक्टर आणि ड्रायव्हरने प्रयत्न केला. याच बसवर ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ हे शासनाचे घोषवाक्य लिहिले होते. नागरिकांनी मात्र याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.