AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड

कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही चोरट्यांना अटक केली. यापैकी आवेश सिद्धीकी हा घाटकोपर येथे राहणारा आहे. तर जाहिद हुसेन अन्सारी हा कळवा येथे राहणारा आहे.

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआड
कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे गजाआडImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 5:06 PM
Share

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर दोन ट्रेन उभ्या होत्या. एका ट्रेनमध्ये एक महिला मोबाईलवर बोलत होती. दोन चोरट्यांची नजर त्या महिलेवर गेली. या चोरट्यांनी संधी साधत एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या महिलेचा मोबाईल (Mobile) हिसकावून पळ काढला. सीसीटीव्ही (CCTV)च्या सहाय्याने कल्याण जीआरपीच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना मुंब्रा येथून अटक (Arrest) केली आहे. हे दोघे सराईत चोर असून आतापर्यंत किती चोरी केल्या याचा तपास सुरु आहे. आवेश सिद्धीकी आणि जाहिद हुसेन अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (Thief arrested for snatching mobile phone from woman at Kalyan railway station)

रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत चोरटे कैद

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर एक ट्रेन उभी होती. त्याच्याशेजारीच आसनगावला जाणारी ट्रेन उभी होती. आसनगावला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक महिला मोबाईल फोनवर बोलत होती. चोरट्यांची नजर या महिलेवर गेली. दोघांपैकी एक चोरटा ट्रेनमध्ये चढला. जशी समोरची ट्रेन सुरू झाली या चोरट्यांनी एका ट्रेनच्या लगेच डब्यातून दुसऱ्या लोकलच्या खिडकीत हात टाकून त्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले होते.

गुप्त माहितीदार आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी अटक

कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही चोरट्यांना अटक केली. यापैकी आवेश सिद्धीकी हा घाटकोपर येथे राहणारा आहे. तर जाहिद हुसेन अन्सारी हा कळवा येथे राहणारा आहे. या दोघांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. या दोघांनी यापूर्वी किती चोऱ्या केल्या याचा तपास पोलिस करीत आहे. रस्त्यावर मोबाईल हिसकावण्याचा घटना घडत होत्या. आता धावत्या ट्रेनमध्ये चोरटे मोबाईल हिसकावून पळू लागल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Thief arrested for snatching mobile phone from woman at Kalyan railway station)

इतर बातम्या

Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Bhandara Crime : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.