डोंबिवलीत हाहा:कार, केमिकल कंपनीच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 65 जखमी, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु

डोंबिवलीत मोठा हाहा:कार उडाला आहे. फेज 2 येथील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक तीन स्फोट झाले. स्फोटांचा आवाज इतका मोठा होता की दोन किमीपर्यंतची धरती हादरली. यामुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, दुकानांचं नुकसान झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी येणार आहेत.

डोंबिवलीत हाहा:कार, केमिकल कंपनीच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 65 जखमी, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु
डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 9:05 PM

डोंबिवली एमआयडीसी फेस 2 येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठा हाहा:कार उडाला आहे. अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बॉयरलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक असे तीन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, कंपनीपासून दोन किमीपर्यंतचा परिसर हादरला. जवळपास दोन किमीपर्यंतची जमीन हादरली. या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच अनके घरांचे पत्र उडाले. रोडवर असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवणं हे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी मोठं आव्हान आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत बॉयलर जवळ काम करत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचारी काम करत होते. त्यामुळे या स्फोटामुळे धाकधूक वाढली आहे.

या घटनेमुळे परिसरातील इमारती, घरे आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 65 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये परिसरातील स्थानिकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर परिसरात एका बालरुग्णालयाचं काचेचं गेटचा चक्काचूर झाला आहे. अगदी पावडर सारखं काचेचा खच रुग्णालयाबाहेर पडला आहे. सुदैवाने या घटनेमुळे कुणी जखमी झालं नाही. पण घटना खूप भीषण आहे.

हे सुद्धा वाचा

तीन कंपन्या जळून खाक

डोंबिवलीतील या घटनेमुळे एमआयडीसीमधील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. अंबर केमिकल कंपनीत स्फोट झाला. ही कंपनी जळून पूर्णपणे खाक झालीय. त्याचबरोबर या कंपनीच्या आजूबाजूच्या ओमीगा केमिकल आणि के जी केमिकल या कंपन्यादेखील जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 10 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....