ठाणे : कळवा, मुंब्रा, विटावा भागाला भेडसावणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेला तिसरा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे न उतरविता आता तो पटनी मैदानाजवळ उतरविण्यात येणार आहे. तर, कळव्यात प्रवेश करताना खाडीपुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करुन तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्यात येणार आहे. शिवाय, अनेक दिवसांपासून रखडलेल्या विटाव्याच्या पुलाचे कामही आगामी चार महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.