AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Politics | मनसेचे एकमेव आमदार VS मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, ‘पाकिटमार’ म्हणत सडकून टीका

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरुन सध्या मनसे आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आलीय. आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलात कलगीतुरा रंगलाय. त्यात दोघांचे कार्यकर्तेही मागे नाहीत.

Kalyan Politics | मनसेचे एकमेव आमदार VS मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, 'पाकिटमार' म्हणत सडकून टीका
| Updated on: Oct 06, 2023 | 9:54 PM
Share

कल्याण | 6 ऑक्टोबर 2023 : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरुन सध्या मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच जुंपलीय. मनसेचे आमदार राजू पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. काही दिवसांपूर्वी राजू पाटील यांना भावी खासदार लिहिलेला केक कापला. इतकंच नाही तर साहेबांनी आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राजू पाटलांच्या घोषणेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात आता वादाला तोंड फुटलंय.

खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटलांच्या आव्हानाला उत्तर देताना आजीच्या पुढे माजी लागायला नको याची काळजी घ्या, असा टोला लगावला. त्यावर राजू पाटलांनीही ट्वीट करत श्रीकांत शिंदे यांना चांगलंच डिवचलंय. “बापाने पॉकेट मनी म्हणून MMRDA, MSRDCचा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता? कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या, रेल्वेच्या प्रवाश्यांना रोज मरणयातना भोगाव्या लागल्या नसत्या”, असं राजू पाटील ट्विटरमध्ये म्हणाले.

‘पाकिटमार’ म्हणत सडकून टीका

राजू पाटलांच्या ट्वीटनंतर आता शिंदे गटातील नेत्यांकडूनही राजू पाटलांना लक्ष्य केलं जातंय. युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी राजू पाटलांचा उल्लेख पाकीटमार दादा असा केलाय. “बिल्डरांकडून ‘पॉकेटमनी’ घेऊन भुमिपुत्रांची ‘पाकिटमारी’ करणाऱ्यांनी इतरांचा पॉकेटमनी काढू नये. भूमिपुत्रांना विकणाऱ्या या दलालांना आता जनताच ‘माजी’ करून टाकणार! आता जनतेचा ‘वादा’, घरी जाणार पाकीटमार ‘दादा’!”, अशी खोचक टीका दीपेश म्हात्रे यांनी केली.

आता रिल्सवॉर सुरु

हा वाद केवळ टीका-टिप्पणी वा ट्विटरवॉरवरच थांबलेला नाही. तर आता या दोन्ही पक्षात आणि नेत्यांमध्ये रिलवॉरही सुरु झालंय. श्रीकांत शिंदे समर्थकांकडून राजू पाटलांचा एक छेडछाड केलेला फोटो व्हायरल करण्यात येतोय. इतकंच नाही तर राजू पाटलांनी ट्वीट करत श्रीकांत शिंदे यांच्यावर जी टीका केली होती, त्यावरील लोकांच्या कमेंट्सचा एक रिल बनवत तोही व्हायरल केला जातोय.

शिंदे समर्थकांकडून व्हायरल करण्यात आलेल्या रिलला आता राजू पाटलांच्या कार्यकर्त्यांनीही त्याचप्रकारे उत्तर दिलंय. पाटलांच्या आजवरच्या कामाचे, पाहणीचे, बैठकींचे फोटो दाखवत, शेवटी आपका क्या होगा माजदार? असा सवाल श्रीकांत शिंदे यांना करण्यात आलाय. आधी ट्वीटरवॉर आणि आता रिल वॉर. कल्याण लोकसभेवरुन मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरु झालेलं हे राजकीय युद्ध पुढे चालून काय रंग घेतं, हे पुढे दिसेलंच.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.