AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेस्क्यू ऑपरेशन कधीपर्यंत?, तपास कुणाकडे?; डोंबिवली दुर्घटनेप्रकरणी दोन मोठ्या अपडेट काय?

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात झालेल्या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेतील एकूण 26 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 64 जण जखमी झाले होते. त्यापैकी 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. या दुर्घटनेत 12 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

रेस्क्यू ऑपरेशन कधीपर्यंत?, तपास कुणाकडे?; डोंबिवली दुर्घटनेप्रकरणी दोन मोठ्या अपडेट काय?
Amudan Chemicals Company blastImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 25, 2024 | 6:27 PM
Share

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटाला आज तीन दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यावरून या स्फोटाची तीव्रता किती मोठी होती हे सहज लक्षात येतं. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. तर स्फोटातील अनेक लोक अजूनही बेपत्ता असून त्यांचा काहीच तपास लागलेला नाही. या मजुरांचे कुटुंबीय रोज घटनास्थळी येऊन आपल्या नातेवाईकाचा मृतदेह सापडतो का? याची वाट पाहताना दिसत आहेत. दरम्यान, हे रेस्क्यू ऑपरेशन कधीपर्यंत चालेल यांची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पण रेस्क्यू ऑपरेशन शेवटचा व्यक्ती सापडेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. एनडीआरएफचे जवान सारंग कुर्वे यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जोपर्यंत शेवटचा मिसिंग व्यक्ती सापडत नाहीये, तोपर्यंत आमचे सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे. या ठिकाणी अजूनही रासायनिक पदार्थ आहेत. काही ठिकाणी आग धुमसते आहे. त्यामुळे धोका आहे. पण आम्ही ते सांभाळून काम करत आहोत. रेस्क्यू ऑपरेशन करताना आग लागली तरी अग्निशमन दल आहे, अशी माहिती सारंग कुर्वे यांनी दिली.

नागरिक संतापले

दरम्यान, आज सकाळपासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू होतं. पण दुपारनंतर चार तास अमुदान कंपनीतील सर्च ऑपरेशन बंद करण्यात आलं. त्यामुळे मृतांचे नातेवाईक आणि नागरिक प्रचंड संतापले. नागरिकांनी पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांवर संताप व्यक्त केला. या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करून पोलिसांना धारेवर धरलं. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

स्पेशल टास्क फोर्सकडे तपास

या स्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला असून त्यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. ⁠या टास्क फोर्समध्ये ठाणे खंडणी विरोधी पथक आणि ठाणे गुन्हे शाखेचा समावेश आहे. ठाणे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मलय मेहता आणि मालती मेहता यांना या प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते.

डीएनए जुळल्यास…

कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी फायर ब्रिगेड, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून तीन दिवसांपासून या कंपनीमध्ये सर्च ऑपरेशन सूरु आहे. आज दुपारनंतर या कंपनीच्या ढिगार्‍याखाली मृतदेहाचे अवशेष सापडले. मृतदेहांचे अवशेष महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अवशेषांवरुन मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी स्फोटाच्या पश्चात बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्ट करुन सॅम्पल घेतले जात आहे. नातेवाईकाचा डीएनए मृतदेहाशी जुळल्यास मृत व्यक्तीची ओळख पटणं सोपं होणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं