वसई-विरारमध्ये रात्री 8च्या आत विसर्जन बंधनकारक; पोलिसांच्या गाईडलाईन जारी

दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन सुरू झाले आहे. वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जनासाठी खास गाईडलाईन जारी केल्या आहेत. रात्री 8च्या आत विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. (vasai virar police issue guidelines for ganesh idol immersion)

वसई-विरारमध्ये रात्री 8च्या आत विसर्जन बंधनकारक; पोलिसांच्या गाईडलाईन जारी
ganesh idol immersion
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 4:15 PM

वसई: दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन सुरू झाले आहे. वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जनासाठी खास गाईडलाईन जारी केल्या आहेत. रात्री 8च्या आत विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच विसर्जन स्थळी केवळ चार भक्तांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे. (vasai virar police issue guidelines for ganesh idol immersion)

गणेशोत्सवासाठी वसई-विरार महापालिका हद्दीत पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सुरू झालं आहे. दीड ते 11 दिवसा पर्यं च्या गणेशोत्सवासाठी शासनाच्या सूचनेनुसार वसई-विरार महापालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या सुचनाप्रमाणेच प्रत्येक गणेशभक्त, गणेश मंडळांना आपला उत्सव साजरा करायचा आहे.

गाईडलाईन काय?

>> आजपासून सुरू होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिकेने 9 प्रभागात एकूण 44 तलाव निश्चित केले आहेत. याच तलावावर शासनाचे नियम पाळून गणरायाचे विसर्जन करायचे आहे.

>> विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गणेशभक्तांनी आपल्या मंडळात किंवा घरीच आरती घेऊन, विसर्जन स्थळावर जायचे आहे. मूर्तीसोबत फक्त 4 गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.

>> रात्री 8 वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांवर बंधनकारक आहे.

>> वसई-विरार, नालासोपारा परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 450 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 750 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

>> तसेच वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलही तैनात असणार आहेत.

>> विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर, तसेच नाकाबंदी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असणार आहे.

>> कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून आजचे विसर्जन आणि पुढील बाप्पाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे, मुंबई सज्ज

विघ्नहर्त्या गणरायाचं काल राज्यात आगमन झालं. वाजतगाजत आणि जयघोष करत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली. आज दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. त्यासाठी ठाणे आणि मुंबई सज्ज झाली आहे. ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी 4 हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी 200 पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यात एक लाख 41 हजार 20 घरगुती तर 1 हजार 58 सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

ऑनलाईन बुकींग आणि विसर्जन व्यवस्था

गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण 40 स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सदर ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा. (vasai virar police issue guidelines for ganesh idol immersion)

संबंधित बातम्या:

Ganesh Chaturthi 2021 | ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालांची उधळण; कोरोना नियमांचं पालन करत गणरायाचं उत्साहात आगमन

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

(vasai virar police issue guidelines for ganesh idol immersion)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.