साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार आहे. शिवाय तारखांचा मेळ जुळत नसल्यामुळे संमेलन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार; तारखांचा मेळ जुळता जुळेना!
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार आहे. शिवाय तारखांचा मेळ जुळत नसल्यामुळे संमेलन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये अखेर होणार आहे. मार्च महिन्यातल्या 26 ते 28 मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलन भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. नोव्हेंबर महिन्यातील 19, 20, 21 या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता. मात्र, आता या तारखात बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. शक्यतो 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होईल, अशी शक्यता आहे.

अध्यक्षांना ठेवले दूर
साहित्य संमेलनासाठी नोव्हेंबरची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, त्याची कल्पना संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी कौटुंबिक कारण सांगत ही तारीख पुढे ढकल्याची विनंती केली. त्यामुळे आता डिसेंबरच्या तारखेवर खल सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे कोरोनाच्या नियमामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंदिस्त सभागृहात घेण्याचे आदेश आहेत. साहित्य संमेनासाठी भव्य हॉल. विविध मंच आणि पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था पाहता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संमेलन घेण्यावर जवळपास एकमत झाल्याचे समजते.

वाढत्या रुग्णांची भीती कायम

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांत वाढत होताना दिसत आहे. या रुग्णांचे सावटही साहित्य संमलेनावर आहे. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोबतच जिल्ह्यात 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 48, बागलाण 7, चांदवड 25, देवळा 6, दिंडोरी 30, इगतपुरी 5, कळवण 16, मालेगाव 4, नांदगाव 11, निफाड 114, पेठ 1, सिन्नर 133, त्र्यंबकेश्वर 10, येवला 62 अशा एकूण 472 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 244, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 23 रुग्ण असून असे एकूण 778 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 10 हजार 109 रुग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रुग्णांची भीतीही संमेलनाच्या आयोजकांना सतावते आहे.

इतर बातम्याः

मायभूमीवरून जीव ओवाळून टाकाणाऱ्या शहीद पोलिसांना मंत्री दादाजी भुसे यांचे नाशिकमध्ये अभिवादन

धक्कादायकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेख

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI