VIDEO: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात कार अडकली, सुदैवानं दोघे बचावले

पुराच्या पाण्यात वाहून जाणारी कार बाहेर काढण्यासाठी दोरीची मदत घेण्यात आली असून, दुसऱ्या गाडीच्या सहाय्यानं तिला बाहेर काढण्यात आलंय.

VIDEO: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात कार अडकली, सुदैवानं दोघे बचावले

पालघर: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक नद्या दुधडी भरून वाहतायत. पालघरमधल्या केळवे रोड येथे पुराच्या पाण्यात कार अडकली, सुदैवाने कारमधील दोघे जण बचावलेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणारी कार बाहेर काढण्यासाठी दोरीची मदत घेण्यात आली असून, दुसऱ्या गाडीच्या सहाय्यानं तिला बाहेर काढण्यात आलंय. (The Car Got Stuck In The Flood Waters in Palghar, Fortunately Both Of Them Survived)

कारमध्ये दोघेजण असल्याने दोघांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांना यश

पालघर जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने काही नदीनाल्यांना पूर आले होते, पालघर तालुक्यातील पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाजवळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखालून कार घेऊन जात असताना अचानक पाणी वाढले आणि पुराच्या पाण्यामध्ये इको कार अडकली. कारमध्ये दोघेजण असल्याने दोघांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांना यश आले आहे. ही घटना दुपारी दीडच्या दरम्यान घडली असून, सुदैवाने कुठली प्रकारे जीवितहानी झाली नाही.

कारला दोरी बांधून दुसऱ्या जीपच्या सहाय्याने काढले बाहेर

शर्थीच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या मदतीने कारला दोरी बांधून दुसऱ्या जीपच्या सहाय्याने इको कारला खेचून बाहेर काढण्यात यश आले. पूर्व-पश्चिम जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारे उड्डाण पूल नसल्याने असे प्रकार प्रत्येक वर्षी घडत असतात.

पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून गाडी चालवणं चालक अन् वाहकांच्या अंगलट

दुसरीकडे कोकणात मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून एसटी बस घालणं चालक आणि वाहकाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अतिवृष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्ट्यात जाणारा रस्ताही बुडाला. असं असताना एसटी चालकाने केलेले धाडस अंगाशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई संकटात नेई, अशी परिस्थिती होती. दरम्यान, प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी आता एसटीचा चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

संबंधित बातम्या

महिलांचे सोने चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न, कर्नाटकच्या भामट्याला ग्रामस्थांनी दिला चोप

Video : 52 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी बस चालक आणि वाहकाचं अखेर निलंबन

Published On - 10:57 pm, Tue, 13 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI