AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही बहीण भाऊ, आमच्यावर…’, अन् दोघांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापुरात एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे.

'आम्ही बहीण भाऊ, आमच्यावर...', अन् दोघांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 3:54 PM
Share

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापुरात एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. सोलापुरातल्या कर्णिक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याच कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे, त्या चिठ्ठीमध्ये आम्ही बहीण-भाऊ आहोत असा उल्लेख आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. सोलापुरातल्या कर्णिक नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुण रोहित ठणकेदार आणि तरुणी अश्विनी केशापुरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे, त्या चिठ्ठीमध्ये आपण बहीण भाऊ असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

‘आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा मजकूर या चिठ्ठीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करतं होता, तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालायत बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला,  याप्रकरणाची सिव्हील हॉस्पिटल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, आत्महत्येचं नेमकं कारण काय असावं? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान  अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच करून दिली होती.  मात्र  रोहित याच्या कुटुंबियांना अश्विनी बद्दल कोणतीही माहिती नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे या घटनेचं गुढ वाढलं आहे, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...