सीआरपीएफमध्ये पहिली महिला कोब्रा टीम सज्ज

सीआरपीएफमध्ये पहिली महिला कोब्रा टीम सज्ज, 6 बटालियनमधून 34 कमांडोंची निवड (The first female cobra team in the CRPF is ready)

सीआरपीएफमध्ये पहिली महिला कोब्रा टीम सज्ज
सीआरपीएफ

नवी दिल्ली : केंद्रीय राखाीव पोलिस बल अर्थात सीआरपीएफची पहिली महिला कोब्रा कमांडो टीम नक्षलवाद्यांशी लढण्यास सज्ज झाली आहे. या टीमसाठी सीआरपीएफच्या सर्व सहा बटालियनमधून 34 महिला कमांडोंची निवड करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी 10 बटालियन स्थापन करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली होती. शनिवारी राजधानी दिल्लीजवळील गुरुग्रामच्या कादरपूर येथील सीआरपीएफ सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात या महिला कमांडोंना कोब्रा टीममध्ये रुजू करण्यात आले. या कार्यक्रमात महिला कमांडोंच्या डोळ्यावर पट्टी बांधून शस्त्रे हाताळणी, फिल्ड-क्राफ्ट ड्रिल, आगीच्या वरुन उडी कशी मारायची आदी बाबींची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. (The first female cobra team in the CRPF is ready)

नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी विशेष प्रशिक्षण

कोब्रा युनिटमध्ये सहभागी करण्यापूर्वी महिला कमांडोंना तीन महिने विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात आधुनिक शस्त्रे हाताळण्याचे कौशल्य विकसित केले जाणार आहे. याशिवाय महिला कमांडोंची शारिरीक क्षमता वाढवली जाईल. जंगलात लपून राहिलेल्या नक्षलवाद्यांपासून स्वत:चा बचाव करीत कसे लढायचे याचेही धडे मिळणार आहेत. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या महिला कमांडोंना पुरुष कमांडोंच्या बरोबरीने छत्तीसगढ आणि झारखंडसारख्या नक्षलग्रस्त भागात तैनात केले जाईल, असे सीआरपीएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (The first female cobra team in the CRPF is ready)

सीआरपीएफकडे 246 कोब्रा बटालियन

2008-2009 मध्ये सीआरपीएफमध्ये कोब्रा टीमच्या दोन बटालियनची स्थापना करण्यात आली होती. 2009-10 मध्ये बटालियनची संख्या वाढवून चार करण्यात आली. 2011-12 मध्ये आणखी चार बटालियनची भर टाकण्यात आली. सध्याच्या घडीला सीआरपीएफकडे एकूण 246 कोब्रा बटालियन आहेत. 34 महिला कमांडोंनी स्वत:हून कोब्रा युनिटमध्ये सहभागी होण्यास तयारी दाखवली होती. याशिवाय आणखी जवळपास 200 महिला कमांडो कोब्रा युनिटमध्ये रुजू होण्यास तयार आहेत, अशी माहिती सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याने दिली.(The first female cobra team in the CRPF is ready)

इतर बातम्या

पोलिसांनो, निधर्मी भावनेने कारवाई करा – हायकोर्ट

सख्खे भाऊ, एकत्र चोरीचा घाट, 11 दुचाकींसह दोघांना अटक

Published On - 7:31 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI