AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट, कोण कोणाविरोधात लढणार? कुठे बंडखोरी? वाचा संपूर्ण यादी

राज्यामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी तसचे विरोधी पक्षांकडून बहुतांश जागी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

अखेर विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट, कोण कोणाविरोधात लढणार? कुठे बंडखोरी? वाचा संपूर्ण यादी
Legislative Council electionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 6:18 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी देखील बहुतांश जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र उमेदवारांची नाव जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. या बंडखोरीचा फटका हा अधिकृत उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. जे इच्छूक होते, परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे पक्षातील नाराज उमेदवार आता या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तायरीमध्ये आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ – पुण्याच्या दोन्ही जागा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आले आहेत. पुणे शिक्षक मतदार संघामध्ये भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आता कौस्तुभ गावडे विरूद्ध जयंत आसगावकर असा सामना रंगणार आहे. परंतु या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश चिवटे हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. तसे संकेत त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.

तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून स्मिता जाधव यांना उमदेवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सभांव्य उमेदवार हर्षदा देशमुख या आहेत, त्यामुळे इथे स्मिता जाधव विरूद्ध हर्षदा देशमुख असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर इथे राष्ट्रवादीकडून बंडखोरी होण्याची शक्यात आहे. भैय्या माने हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपकडून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार अनिल सोले हे बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत.

अमरावती शिक्षकण मतदार संघामध्ये आदिती पोहरे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे इच्छूक असल्यामुळे इथेही बंडखोरीची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने सतिश चव्हाण यांना पून्हा एकदा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार दिलिप घुगे असण्याची शक्यता आहे, मात्र अजूनही ठाकरे गटाकडून आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. दरम्यान दुसरीकडे या जागेसाठी   भाजपचे संजय केणेकर देखील मैत्रीपुर्ण लढतीसाठी इच्छूक आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात