अलिबाग ते वडखळ रस्ता दोन पदरी करावा; आमदार जयंत पाटील यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

सुरज मसुरकर

सुरज मसुरकर | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jun 08, 2022 | 10:42 PM

अलिबाग येथील वाढते आकर्षण लक्षात घेता. पर्यटकांच्या दृष्टीने अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्यात यावा जेणे करुन नागरिकांना वहातुकीच्या समस्यांना काही अंशी दिलासा मिळेल.

अलिबाग ते वडखळ रस्ता दोन पदरी करावा; आमदार जयंत पाटील यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी
केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी
Image Credit source: tv9

अलिबाग : अलिबाग ते वडखळ हा रस्ता (Alibag to Vadkhal Road) दोन पदरी करण्याच्या मागणीला जोर धरत आहे. त्याचकामी केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची 7 जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबतचे निवेदन त्यांना दिले. अलिबाग हे पर्यटन स्थळ असून ते मुंबईच्या जवळ आहे. यामुळे सध्याच्या काळात पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात ये-जा ही होत असते. या पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वहानांची कोंडी होऊन पर्यटकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे अलिबागच्या विकासाचा आणि पर्यटकांच्या होणाऱ्या त्रासाचा विचार करून अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करावा.

रस्त्यावर वहांनाची कोंडी

तसेच अलिबाग ते वडखळ हा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर वहांनाची कोंडी वाढत आहे. अलिबाग येथील वाढते आकर्षण लक्षात घेता. पर्यटकांच्या दृष्टीने अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्यात यावा जेणे करुन नागरिकांना वहातुकीच्या समस्यांना काही अंशी दिलासा मिळेल. तसेच रस्ता दुपदरी करण्याकरिता आवश्यक असणारी जमिन ही विशेषतः शासकीय मालकीची आहे. त्यामुळे खाजगी जागेचे हस्तांतरण करण्याचीही आवश्यकता नाही. त्यामुळे अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करण्याच्या योजनेचा विचार करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी आंदोलन केले होते

दरम्यान वडखळ-अलिबाग रस्त्याची झालेली दुरवस्थेमुळे येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा रस्ता जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यास मंजुरी दिली होती. पण आता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा रस्ताच दोन पदरी करावा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा रस्ता आता दोन पदरी होतो का? प्रवाशांसह पर्यटकांचे हाल थांबतील का हे पहावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI