Sindhudurg airport : सिंधुदुर्ग विमानतळावरची दहशत संपेना, आधी कोल्हे आता बिबट्यांचा वावर

सिंधुदुर्ग विमानतळावरून रोज एक विमान मुंबईला फेरी मारून जात. त्यामुळे प्रवाशांची सख्याही वाढली आहे. अशातच बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर पायलटचीही डोकेदुखी वाढली आहे.

Sindhudurg airport : सिंधुदुर्ग विमानतळावरची दहशत संपेना, आधी कोल्हे आता बिबट्यांचा वावर
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 6:46 PM

सिधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील दहशत अजूनही काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. कारण आधी विमानतळावर कोल्ह्यांचा वावर असल्याचं अनेकांनी पाहिलं आणि आता तर चक्क बिबट्याचा वावर दिसून आलाय. चिपी विमानतळावर प्रवाशांसह, पायलटनीही बिबट्याला पाहिलं आहे. त्यामुळे सर्वांमध्येच दहशतीचं वातावरण आहे. मोठ्या राजकीय ड्राम्यानंतर सुरू झालेल्या  चिपी विमानतळावरून काही दिवसांपूर्वीच उड्डाणाला सुरूवात झाली आहे.

बिबट्याची थेट विमानतळावर एन्ट्री

दोन दिवसांपूर्वी बिबट्यानं थेट विमानतळाच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेत थेट विमानतळावर प्रवेश केला. सिंधुदुर्ग विमानतळावरून रोज एक विमान मुंबईला फेरी मारून जात. त्यामुळे प्रवाशांची सख्याही वाढली आहे. अशातच बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर पायलटचीही डोकेदुखी वाढली आहे.

विमानतळावर कोल्ह्यांचा वावर कायमचा

सिंधुदुर्ग विमानतळावर कोल्हे तर रोज वावरतात. पायलट आणि प्रवाशांना रोज कोल्ह्यांंच दर्शन होतंय. बिमानतळावर बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर तातडीने तिथल्या वरिष्ठांना माहिती देण्यात आली. प्रशासनानं बिबट्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दर्शन देऊन बिबट्या पसार झाला होता. फक्त प्रवाशी आणि पायलटच नाही तर विमानतळावरील कर्मचाऱ्यांचीही चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. याआधी कोल्हे दिसल्यानंतर प्रशासनानं त्यांचाही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोल्ह्यांनी प्रशासनाला चकमा दिला आहे. परिसरात पिंजरे लावूनही कोल्हे विमानतळावर यायचे थांबले नाही. एकही कोल्हा पिंजऱ्यात अडकला नाही. त्यामुळे आता किमान बिबट्याचा बंदोबस्त होणार की प्रवासी आणि विमानतळ प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय सांगता? नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल, नितीन गडकरींचं वक्तव्य

26/11: धावत्या मुंबईला थांबायला लावणारा हल्ला! असंख्य जखमा, रक्तपात अन् दहशतवाद्यांशी दोन-हात!

पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही; पाच तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.