AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. | CM Uddhav Thackeray

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 19, 2020 | 12:13 PM
Share

सोलापूर: हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या मी नेमकी किती मदत करायची याची माहिती गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. (CM Uddhav Thackeray in Solapur)

उद्धव ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना आश्वस्त केले. हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला नाराज करणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या किती मदत करायची ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. ही माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही त्यावर अभ्यास करत बसणार नाही. तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मला यावरुन कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरुन राजकारण करु नये. कधीकाळी आपणही सत्तेत होतो, याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

याशिवाय, राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूरातील आजच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 11 कुटुंबीयांना नुकसानभरपाईच्या धनादेशांचे वाटप केले. संबंधित बातम्या:

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही : शरद पवार

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही; सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक

(CM Uddhav Thackeray in Solapur)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा