AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातील साठवण तलावात पोहण्यास गेलेले एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाले, अहिल्यानगरातील धक्कादायक प्रकार

लोणी जवळच्या चंद्रपूर गावात साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गावातील साठवण तलावात पोहण्यास गेलेले एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाले, अहिल्यानगरातील धक्कादायक प्रकार
MBA student drowned
| Updated on: May 28, 2026 | 8:32 PM
Share

गावातील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगरातील लोणी जवळील चंद्रपूर गावात घडली आहे.या घटनेतील तिघे तरुण पायरेन्स IBMA कॉलेजात शिकणारे MBA चे विद्यार्थी असल्याचे उघडकीस आले आहे. या विद्यार्थ्यांना तलावातील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

अहिल्यानगरातील लोणी जवळच्या चंद्रपूरात पिकनिकसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी उन्हाच्या कडाक्याने या गावाच्या साठवण तलावात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. या विद्यार्थ्यांच्या सोबतच्या मित्रांनी आपले मित्र बुडाताना पाहून मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. मात्र, स्थानिक लोक मदतीसाठी येण्या आधीच या तरुणांना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या मुलांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मदत मिळण्याआधीच जीव गेला

अहिल्यानगरातील लोणी जवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात काही तरुण सुट्टीचा आनंद घेत पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील तिघा तरुणांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांनी मदतीसाठी आराडा ओरडा सुरु केला. त्यावेळी त्यांचे काही सहकारी तलावाच्या किनाऱ्यावर होते. त्यांनी मदतीसाठी स्थानिकांना बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी मदत करण्यापूर्वीच या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या दुर्दैवी घटनेत अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा) , प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) , महेश अशोक शिंदे (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) यांचा बुडून मृत्यू  झाला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे बुडून मृत्यू झाल्याने परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला