औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात नवे सवंगडी; समृद्धी वाघीणीने दिला पाच बछड्यांना जन्म

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात नवे सवंगडी; समृद्धी वाघीणीने दिला पाच बछड्यांना जन्म

औरंगाबाद : औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Garden and Zoo) वाघ सिद्धार्थ आणि वाघीण समृद्धी (Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs) यांनी पाच बछड्यांना जन्म दिला आहे. शुक्रवारी सकाळी वाघीण समृद्धीने या पाच बछड्यांना जन्म दिला. या पाचही बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. सध्या पशुवैद्यकांच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जात आहे (Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs).

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान समृद्धी वाघीणने पाच बछड्यांना जन्म दिला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. थंडीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी हिटरची सोय करण्यात आली आहे.

तसेच, त्यांची देखरेख करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला आहे. तसेच, त्यांची काळजी घेण्यासाठी 24 तास एक केअरटेकरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय, अजून कोणालाही त्यांच्याजवळ जाण्याची परवानगी नाही, असंही संचालकांनी सांगितलं.

एनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबत ट्वीट केलं आहे.

समृद्धी वाघणिने 5 बछड्यांना जन्म दिल्यानंतर सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचा संख्या आता 14 वर पोहचली आहे. वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिल्याने व्याघ्रप्रेमीमधून आनंद व्यक्त केला जात आहे. याआधी समृद्धी वाघिणीने 26 एप्रिल 2019 रोजी 4 बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक नर आणि तीन मादा होत्या. त्यापूर्वी 16 नोव्हेंबर 2016 रोजी तिने तीन बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक नर आणि दोन मादा होत्या.

Tigress Samrudhhi Gave Birth To Five Cubs

संबंधित बातम्या :

‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधीचं ‘अवनी’ वाघिणीसाठी भावनिक पत्र

Photos | ‘झाडाला मिठी मारणारी वाघीण ते लांब नाकाचं माकड’, ‘या’ फोटोंनी केवळ पुरस्कारच नाही तर लोकांची मनंही जिंकली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI