वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ: नरभक्षक वाघीण ‘टी-वन’ला ठार करणारे शार्प शूटर अजगर अली यांनी सगळा थरार सांगितला. या वाघिणीला मारणं हा उद्देश नव्हता. तिला ठार केल्याने मला आनंद झाला असं नाही. उलट तिला जिवंत पकडले असते, तर बरं वाटलं असतं, असं टी वन वाघिणीला ठार करणारे शूटर अजगर अली यांनी टीव्ही 9 ला …

, वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ: नरभक्षक वाघीण ‘टी-वन’ला ठार करणारे शार्प शूटर अजगर अली यांनी सगळा थरार सांगितला. या वाघिणीला मारणं हा उद्देश नव्हता. तिला ठार केल्याने मला आनंद झाला असं नाही. उलट तिला जिवंत पकडले असते, तर बरं वाटलं असतं, असं टी वन वाघिणीला ठार करणारे शूटर अजगर अली यांनी टीव्ही 9 ला सांगितलं.

अजगर अली म्हणाले, “नरभक्षक वाघिणीची माहिती बोराटी गावातील ग्रामस्थांनी दिली होती. जिल्ह्यातील राळेगावात शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. बोराटी गावचे शेतकरी बाजारासाठी जात असताना त्यांना टी वन वाघीण रस्त्यावर दिसली होती. नागरिकांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली. वन विभागाने या भागात गस्त वाढवली आणि कॅमेरे लावले. तिला ट्रॅप करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. आम्ही तिला बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती चवताळून आमच्या जिप्सी गाडीवर धावून आली. त्यावेळी आम्हाला आमच्या बचावासाठी तिला गोळी मारावी लागली. तिला मारणे हा उद्देश नव्हता, तिला मारल्याने मनाला आनंद होत नाही, तिला जिवंत पकडलं असतं, तर बरं वाटलं असतं” विवेक गावंडे यांनी

वाघिणीचा खात्मा

तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात अखेर दीड महिन्यांनी यश आलं. शार्प शूटर अजगर अलीने शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *