जी. श्रीकांत यांच्यासह राज्यातील 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या आहेत. तशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:18 PM, 24 Feb 2021
जी. श्रीकांत यांच्यासह राज्यातील 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या आहेत. तशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये जी. श्रीकांत, एल. एस. माळी, व्ही. एल. भीमनवार, राहुल खेरावार, एच. एस. वासेकर, प्रजित नायर यांचा समावेश आहे.(Transfers of 6 IAS officers in the state)

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती?

1. जी. श्रीकांत : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांची औरंगाबाद इथं विक्रीकर सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. जी. श्रीकांत हे 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

2. एल. एस. माळी : सह सचिव, ग्रामविकास विभाग यांची संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

3. व्ही. एल. भीमनवार : यांची उपसचिव (माहिती व तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

4. राहुल खेरावार : यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला इथं व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2011च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

5. एच. एस. वासेकर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2015 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

6. प्रजित नायर : सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP जव्हार, तालुका पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग इथं नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2017 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

इतर बातम्या :

10 वर्षाच्या मुलीने 2 वर्षांपूर्वी गिळलेली पिन फुफ्फुसातून काढण्यात डॉक्टरांना यश

आता पोस्टाच्या बचत योजनाही खासगी बँकेत उपलब्ध होणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Transfers of 6 IAS officers in the state