मुंबई-पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या, 12 आणि 13 डिसेंबरला या गाड्यांच्या फेऱ्या रद्द

मुंबई-पुण्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

मुंबई-पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या, 12 आणि 13 डिसेंबरला या गाड्यांच्या फेऱ्या रद्द

पुणे : मुंबई-पुण्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामामुळे उद्या पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबरला या गाडीची मुंबई ते पुणे ही फेरीही रद्द होणार आहे. तर जयपूर-पुणे ही गाडी 13 डिसेंबरला याच कामासाठी कल्याण स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. (traveling by train from Mumbai Pune should pay attention these some train is canceled on 12th and 13th December)

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर जयपूर-पुणे रेल्वे पुन्हा पुण्याकडे रवाना केली जाईल. तर हा बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. खरंतर, एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिकांचे मोठा हाल होत आहे. तर दुसरीकडे आता सर्वसामांन्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कारण, कोरोनाच्या संकटकाळात आता सर्वसामान्यांना आणखी आर्थिक फटका बसणार आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता लवकर ट्रेनची तिकिटे महाग होणार आहेत. ज्याप्रमाणे विमानतळांवर युजर चार्ज (User Charge) आकारला जातो त्याप्रमाणे आता देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवरही (Railway Stations) वापरकर्त्याकडून शुल्क आकारला जाणार आहे.

येत्या दोन आठवड्यांत वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा शुल्क 10-50 रुपयांदरम्यान असू शकतो. वापरकर्त्याने शुल्क आकारल्यानंतर प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, येत्या दोन आठवड्यांत काही रेल्वे स्थानकांवर यूजर चार्ज लावण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेऊ शकतं. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) वेगवेगळ्या वर्गातील प्रवाश्यांसाठी 10 ते 50 रुपयांपर्यंत वापरकर्ता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. फस्ट क्लासच्या प्रवाशांकडून अधिक वापरकर्ता शुल्क आकारला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यूजर्स चार्ज किती स्टेशनवर वापरायचा याविषयी रेल्वे मंत्रालय निर्णय घ्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 120 प्रमुख स्थानकांवर वापरकर्ता शुल्क आकरण्यात येईल. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), नागपूर, तिरुपती, चंदीगड, ग्वाल्हेर, पुडुचेरी आणि साबरमती यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली आणि मुंबईसाठी बोलीची तारीख 18 डिसेंबर आणि 15 डिसेंबर करण्यात आली आहे. (traveling by train from Mumbai Pune should pay attention these some train is canceled on 12th and 13th December)

इतर बातम्या –

आता ट्रेन तिकिट महागणार, CSMT सह ‘या’ रेल्वे स्थानकांवर द्यावे लागणार जास्त पैसे

Indian Railway | रेल्वेच्या डब्यांवरील क्रमांकाचा नेमका अर्थ काय? कोचबद्दल खूप काही माहिती देतील ‘हे’ आकडे…

(traveling by train from Mumbai Pune should pay attention these some train is canceled on 12th and 13th December)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI