नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंपाठोपाठ महापौरही रस्त्यावर, नियम तोडणाऱ्यांचा फैसला ‘ऑन द स्पॉट’

महापौर संदीप जोशी आणि आयुक्त मुंढे हे दोघेही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शहराचे प्रथम नागरिक आणि आयुक्त रस्त्यावर उतरले आहेत.Tukaram Mundhe and Sandeep Joshi

नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंपाठोपाठ महापौरही रस्त्यावर, नियम तोडणाऱ्यांचा फैसला 'ऑन द स्पॉट'
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 12:37 PM

नागपूर : नागपुरात महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. तरीही कोरोनाच्या या संकटात लोकांच्या हितासाठी, नियम तोडणाऱ्यांविरोधात, महापौर आणि आयुक्त दोघेही रस्त्यावर उतरले आहेत. ज्या बाजारपेठांमध्ये कोरोनाबाबत ठरवलेले नियम तोडले जातात, त्यांच्यावर ऑन द स्पॉट कारवाई सुरु झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी काल संध्याकाळीही अशीच धडक कारवाई केली होती. (Tukaram Mundhe and Sandeep Joshi in action mode)

नागपुरात कोरोना रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार गेली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. नियम मोडणाऱ्यांमुळे कोरोनाचा वेगानं प्रसार होतोय. त्यामुळेच महापौर आणि आयुक्त रस्त्यावर उतरुन, नियम मोडणाऱ्यांवर ‘ऑन द स्पॉट’ दंड करुन कारवाई केली जात आहे. (Tukaram Mundhe and Sandeep Joshi in action mode)

महापौर संदीप जोशी आणि आयुक्त मुंढे हे दोघेही अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शहराचे प्रथम नागरिक आणि आयुक्त रस्त्यावर उतरले आहेत. बाजारपेठांमध्ये दौरा करुन कारवाईचे निर्देश दिले जात आहेत.

कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी गोपालनगर, प्रतापनगर परिसरात पायदळ फिरत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सम-विषम नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारावाईचे निर्देश महापौरांनी दिले, तर इकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज, बर्डी, कॉटनमार्केट, चिटणीसपार्क परिसरात आकस्मिक दौरा केला आणि सम – विषम नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ऑन द स्पॉट कारवाई केली.

नागपूर शहरात थोड्या फायद्याच्या हव्यासापोटी काही व्यापारी बाजारात सम-विषय नियमांचं सर्रास उल्लंघन करतात. ‘टीव्ही 9 मराठी’ने ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. अनेक लोकांच्याही याबाबत तक्रारी होत्या, त्यानंतर शहरात महापौर आणि मनपा आयुक्तांनी धडक कारवाई सुरु केली.

संबंधिक बातम्या 

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.