3600 सीसीटीव्हींची नागपूरवर नजर, तुकाराम मुंढेंकडून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा आढावा

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (9 ऑगस्ट) महापालिका मुख्यालयातील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला भेट दिली (Tukaram Mundhe visit Emergency Operations Center).

3600 सीसीटीव्हींची नागपूरवर नजर, तुकाराम मुंढेंकडून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा आढावा

नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (9 ऑगस्ट) महापालिका मुख्यालयातील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला भेट दिली (Tukaram Mundhe visit Emergency Operations Center). यावेळी त्यांनी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आपत्कालीन सेवेसाठी सज्ज आहे का, याची खातकजमा केली. नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. या सर्व कॅमेऱ्यांवर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर येथे लक्ष ठेवले जाते (Tukaram Mundhe visit Emergency Operations Center ).

तुकाराम मुंढे यांनी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला स्वत: भेट देऊन तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. तक्रारींचे स्वरुप, त्यावर होणारी कार्यवाही, नागरिकांचे समाधान होत आहे की नाही? याबाबत खातरजमा करण्यासाठी त्यांनी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये नागपूरमधील 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवले जाते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

तुकाराम मुंढे यांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह फुटेज बघितले. यावेळी त्यांना ज्या ठिकाणी समस्या दिसली तिथे त्यांनी तातडीने संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पाठवले. त्या कर्मचाऱ्याशी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मोबाईलवरुन संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली.

नागपुरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसह प्रसंगी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

पावसाळ्यात कोणतंही संकट उद्भवू शकतं. अशावेळी प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने घटनास्थळी दाखल होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रशासनाला संबंधित समस्येविषयी माहिती असणं जरुरीचं आहे. त्यामुळे प्रशासनाला 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीवर लक्ष देता येणार आहे.

हेही वाचा : ‘आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन’, तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *