AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा महासंकल्प, शेतीतून समृद्धीकडे! TV9 मराठीचा युवा शेतकरी आणि मराठवाड्यासाठी खास कार्यक्रम

TV9 मराठीने युवा शेतकरी आणि मराठवाड्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. शेतीच्या विकासाबाबत या कार्यक्रमात चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्राचा महासंकल्प, शेतीतून समृद्धीकडे! TV9 मराठीचा युवा शेतकरी आणि मराठवाड्यासाठी खास कार्यक्रम
Tv9 Marathi Agriculture Show
| Updated on: Sep 17, 2025 | 3:49 PM
Share

राज्यातच नव्हे तर देशात मराठवाड्याची नेहमीच वेगळी ओळख राहिली आहे. देशाच्या हरितक्रांतीनंतर राज्यातल्या कृषी क्रांतीत मराठवाड्याचे एक मानाचे स्थान आहे. धान्य उत्पादनातल्या विक्रमाबरोबर कापूस आणि उसाच्या उत्पादनात या भागाने आपले वेगळेपण राज्यात सिद्ध केले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यात सिंचनाच्या सुविधा समाधानकारक आहेत. परिणामी मराठवाड्याने कापूस, साखर, फळे, भाजीपाला, दूध आणि विशेषत: कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

रोजगारासाठी मराठवाड्याची सर्वाधिक मदार ही शेतीवरच आहे. अशात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूरचे वाढते शहरीकरण तर जालना पट्ट्यातल्या वाढत्या औद्योगिकरणामुळे मराठवाड्यातली शेतमालाची बाजारपेठही विस्तारू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले वाढते पर्यटन आणि औद्योगिक विस्तार यामुळेही शेतीच्या विकासाला चालना मिळू लागली आहे. पण इथे खरी कृषीक्रांती आणली ते गेल्या दशकातल्या नागपूरहून मुंबईला गेलेल्या समृद्धी महामार्गाने. हा महामार्ग झाल्यापासून एका दिवसाच्या अंतरावर असलेली मायापुरी मुंबई अवघ्या काही तासांच्या अंतरावर आली आहे. त्यामुळे मुंबईची भली मोठी अन्नधान्याची, फळा-फुलांची, दुधाची बाजारपेठ मराठवाड्यासाठी खुली झाली आहे.

या महामार्गामुळे मराठवाड्यातला शेतमाल आता मुंबईत काही तासात पोहचतोय. नगदी पिकांमुळे मराठवाड्याच्या अर्थकारणाला तादक मिळण्यास सर्वात मोठी मदत मिळाली आहे. याचा फायदा तरुण पिढीतल्या शेतकऱ्यांना आणि शेतीपूरक उद्योग करणाऱ्या कृषी व्यवसायिकांना होऊ लागला आहे. मुंबई-ठाण्यात मागणी असलणाऱ्या फळं-भाज्या, दूध यावर प्रक्रिया करणारे अनेक व्यवसाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड भागात उभे राहू लागले आहेत.

शहरांना लागणारी अन्नधान्याची गरज भागवणारी शेती पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात जास्त प्रमाणात आहे. आता मराठवाडासुद्धा हरितक्रांती आणि बाजार कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊन आपली कृषकोन्नती साधण्यासाठी मागे राहणार नाही. याच निमीत्ताने टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत 18 सप्टेबर रोजी ‘महाराष्ट्राचा महासंकल्प, शेतीतून समृद्धीकडे’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांना उद्घाटन मार्गदर्शनासाठी निमंत्रीत केले आहे. त्याचबरोबर राज्याचे दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह फलोत्पादन आणि रोहयोमंत्री भरत गोगावले हे देखील तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात विजय अण्णा बोराडे खास मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमातील प्रमुख विषय आणि त्यांचे मार्गदर्शक

  • आत्मनिर्भरता ही काळाची गरज – विजयअण्णा बोराडे, कृषी तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर
  • शेतीतील आत्मनिर्भरता व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे गरजेचे, राजेंद्र बारवाले, अध्यक्ष, महिको प्रायव्हेट लिमिटेड
  • शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण बँकेची कटिबद्धता, मिलिंद घारड, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण बँक
  • शेतकरी व आर्थिक नियोजन, विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
  • मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे महामहीम राज्यपाल, राजस्थान
  • शेतीची सद्यस्थिती व पुढील 25 वर्षे, विलास शिंदे अध्यक्ष, सह्याद्री ऍग्रो
  • युवा पिढीला शेतीकडे कसे वळवता येईल, अमेय निमकर, संचालक, आय. ए. जी.
  • तंत्रज्ञान आणि AI चा वापर, शेती होईल अधिक सुकर!, प्रसाद कुलकर्णी, बिझनेस हेड, ऍडराईज इंडिया
  • दुप्पट भाव : शेतकऱ्यांची फसवणूक होतेय का?, डॉ.कल्याण काळे, जालना लोकसभा खासदार
  • दुग्धव्यवसाय : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी, अतुल सावे, दुग्धविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य
  • शाश्वत शेती तंत्रज्ञान : शेती विकासाचे तंत्र, डॉ. कामेश्वर धापके, संचालक, ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूट्स एमजीएम हिल्स, गांधेली
  • बियाणे उद्योगातील अडचणी व त्यावरील उपाय, अजित मुळे, व्यवस्थापकीय संचालक, ग्रीन गोल्ड सीड्स
  • फलोत्पादन : तरुणांसाठी अमर्याद संधी, भरतशेठ गोगावले, फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य

यावेळी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसह अनेक मान्यवर, कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी पदविकेचे विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हयात प्लेस येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.