Maharashatra News Live : सिंधुदुर्ग – भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – वैभव नाईक
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर सध्या वातावरण तापलं आहे. याप्रकरणी विविध राजकीय नेते, मंत्री प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करताना दिसत आहे. याप्रकरणी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिवाळीनंतर राज्यात पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे शहर आणि घाट माथ्यासाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा ४८ तासांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
