
राज्यातून पाऊस परतताच तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह अनेक भागांत सकाळपासूनच दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील ढोबळेवाडी ते रांजणी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर चिखल झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलांचे हाल होत आहे, या रस्त्यावरून दुचाकी वर सोडा पायी देखील चालणं कठीण झाला आहे. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला याबाबत निवेदन दिले आहे मात्र कोणीही दखल घेतली नाही. धाराशिव येथे अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या जनावरांचा पुरावा नसेल तरी पशु मालकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. निर्णयामुळे अतिवृष्टीमधील पशू पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुर्ल्यात ‘कपाडिया नगर’मध्ये भीषण आग लागली आहे. आगीत 15 – 25 गाळ्यांमधील ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट्स, टायर, इलेक्ट्रिक वस्तू आणि स्क्रॅप मटेरियल्स जळून खाक झाले आहेत. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, तरुणाला दमदाटी करत मारहाण
तीन ते चार जणांची दमदाटी करत तरुणाला मारहाण
मारहाणीनंतर तरुणाच्या घरी जाऊन, विटांनी तरुणाच्या घराचा दरवाजा आणि गाडीच्या काचाही तोडल्या.
तरुणाला ठार मारण्याची धमकी, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये पावसाची जोरदार हजेरी
सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान एक तास मुसळधार पाऊस
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा मोठं नुकसान
हिवाळ्याच्या तोंडावर भामरागडमध्ये दोनदा परतीच्या पावसाचा फटका
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आता सर्व शासकीय कामकाज मराठीतच होणार
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश,
मराठी ही आपली अस्मिता आहे आणि तिचा अपमान सहन केला जाणार नाही – प्रताप सरनाईक
जळगाव शहरातील दशरथ नगरात मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे, कचरा आणि गवत यामुळे आग आणखी भडकली, या घटनेत रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान झालं आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदांसाठीची आरक्षण सोडत आज अखेर जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांचे भवितव्य निश्चित झाले आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा मुख्य हंगाम अजून 10 दिवस सुरू राहणार आहे. यंदा ऑक्टोंबर च्या शेवटच्या आठवड्यात हा हंगाम राहणार असल्याने दिवाळीतही कास परिसरात पर्यटकांची गर्दी पहायला मिळणार आहे. दरम्यान पठारावर मिकी माऊस या पिवळ्या फुलांचा बहर पाहायला मिळत असून, जणू कास पठार पिवळे धमक दिसत आहे. कास पठारावरील फुलांची नजाकत पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी कायम आहे.
आदिवासी प्रवर्गात अन्य जातींची घुसखोरी करण्यासंदर्भात राज्यात वेगवेगळी विधाने केली जात आहे. या विरोधात राज्यभरातील आदिवासींनी आता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रपुरात आज ऐतिहासिक कोहिनूर तलावातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य घुसखोरी विरोधी मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाज बांधवांनी यात हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. राज्य सरकार जाती-जातीत कोंबडे लढत असून एसटी प्रवर्गात घुसखोरीचा कोणताही प्रयत्न झाल्यास दिल्लीतही मोठा मोर्चा व शक्ती प्रदर्शन करू असा इशाराच आदिवासींनी दिला आहे.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी बाजारामध्ये झालेल्या कचऱ्याच्या त्रासाला कंटाळुन, जयभीम संघटनेच्या वतीने तेथील कचरा उचलून थेट बाजार समितीच्या गेट समोर कचरा टाकून आंदोलन केले. जय भीम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. केळी बाजारात साठलेल्या कचऱ्याचा, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय. वारंवार मागणी करूनही बाजार समिती याकडे लक्ष देत नसल्याने जय भीम संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गटासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे .अनुसूचित जाती 08, अनुसूचित जमाती 06 इतर मागास प्रवर्ग 14, सर्वसाधारण 24 अशा एकूण 52 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वर्सोवा ब्रिज ते वसई फाट्यापर्यंत 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. ठाणे रोडवर गायमुख येथे काम सुरू असल्याने सकाळपासून महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
ठाण्यात मनसे आणि ठाकरे सेनेच्या संयुक्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा संयुक्त मोर्चा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहे. ठाण्यातील विविध समस्यांबाबत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावी आणि इतर समस्यांसाठी ही भेट घेतली. पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी घेऊन बोगस मतदानाबाबत चर्चा केली. खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यावेळेस उपस्थित होते.
अकोले येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी तहसिलदारांना घेराव घातला. अतिवृष्टीनंतर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना धारेवर धरलं.
जळगावात एका व्यावसायिकाची तब्बल 4 लाख 64 हजार 439 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. घरातील वॉशिंग मशीन नादुरुस्त झाल्याने गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन संपर्क करणे व्यावसायिकाला महागात पडलं. वॉशिंग मशीन दुरूस्तीच्या बहाण्याने भामट्यांनी व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल पाठवली. ही फाईल आटो डाउनलोड झाली. त्यामुळे व्यावसायिकाच्या खात्यातील 4 लाख 64 हजार 439 रुपये झटक्यात गायब झाले. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा निवडणुकीच्या आढाव्यासाठी विभागाच्या बैठका सुरु असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबई पालिका क्षेत्रात पुढील आठवड्यात आढावा घेऊ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुणे विद्येचं माहेरघर होतं, आता गुंडांचं माहेरघर झालं आहे. अजित पवारांमुळे पुणे हे गुंडांचे माहेरघर झालंय असंही राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर राऊतांनी शिंदेंवर निशाना साधत म्हटलं की गृहमंत्र्यांनी ठाण्याच्या गुंडगिरीबद्दलही आदेश देणं गरजेचं असल्याचं राऊत यांनी म्हटलं.
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत हे दोन्ही पक्षा मोर्चा काढणार आहेत. राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव हे देखील मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा आहे.
थोड्याच ठाण्यात वेळात मनसे आणि ठाकरे सेनेचा मोर्चा निघणार आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद पवारांच्या
राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा आहे.
भंगाराच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याला दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण. हातपाय बांधून रात्रभर मारहाण केल्याने चोराचा मृत्यू. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात ही घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जनआक्रोश आंदोलन संपलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाकडून नोटीस बजावल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी भाषणात वादग्रस्त बोलणे टाळले.
नाशिकमध्ये आदिवासींचा आज उलगुलान मोर्चा आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. आदिवासींच्या आरक्षणातून धनगरांना आणि बाजारांना आरक्षण देऊ नये अशी मागणी केली जात आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 1100 रूपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रूपयांनी वाढ झाली आहे
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान दोन वेगवेगळ्या आणि धक्कादायक घटनांमध्ये दोन मेल एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांमध्ये कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. सुदैवाने, या दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झालेली नाही. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिपू पठाण याच्यावर खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एका ३१ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, टिपू पठाण आणि त्याच्यासह इतर १३ जणांनी बेकायदेशीरपणे जागेवर ताबा मारला. जागेचा ताबा सोडण्यासाठी टिपूने फिर्यादीकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, टिपू पठाण याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ जागांसाठी अखेर आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राजवट असल्याने उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या स्थानिक नेत्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, अनुसूचित जाती (SC) साठी १०, अनुसूचित जमाती (ST) साठी १, इतर मागास प्रवर्ग (OBC) साठी १८ तर सर्वसाधारण वर्गासाठी ३९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीतील त्रुटी (चुका) दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ आयोगाकडे जाणार असल्याची माहिती दिली. या शिष्टमंडळात मनसे, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट या प्रमुख पक्ष एकत्र असणार आहेत. ही भेट केवळ निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी मर्यादित असून, यात महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे उल्फा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली, तसेच वाघेगव्हाण आणि कव्हे या दोन गावांना जोडणारा वाहून गेलेला बंधारा देखील प्रत्यक्ष पाहिला. दरेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला असून, झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपची आज पश्चिम विदर्भ आढावा बैठक.पाच जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपने तयारी सुरू केली असून आज भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक अमरावती येथील राम मेघे कॉलेज मध्ये पार पडत आहे. यावेळी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहतील.
उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार. ‘आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार. राज्यातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात’ असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. फडणवीस, दादा, शिंदेंनाही निमंत्रण पाठवलय असं बाळा नांदगावकर म्हणाले. आम्ही काँग्रेसला कोणताही प्रस्ताव पाठवला नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली. संजय राऊत यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती. संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. दोन दिवसांपूर्वी राऊत यांचं रुटिन चेकअप केलं होतं.
आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी आरक्षण सोडत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिला ओबीसी आरक्षण निघाल्याने आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. विविध पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर.
महाराष्ट्राची भ्रष्टाचाराची राजधानी म्हणजे ठाणे महापालिका आहे अशी टीका अविनाश जाधव मनसे नेते यांनी केली. मी याआधी देखील बोलत होतो. घोडबंदर रोड हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात येतो. ठाण्याला मुख्यमंत्री आणि मंत्री पद दिले मात्र विकास झाला नाही. ठेकेदार आणि राजकीय लोक भ्रष्टाचार आहे. इन्क्वायरी लावली तर मोठे लोक जेल मध्ये जातील असा इशाराही जाधव यांनी दिला.
शहापूरमध्ये प्लास्टिक कंपनीत मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. हैदराबादचे गॅजेट निघालं नसतं तर आपण एसटीमध्ये आहोत ते कळलं नसतं. आम्हाला अगोदर माहीत होतं की आपण एसटीमध्ये आहोत. तेलंगणात आपले अनेक पाहुणे एसटीमध्ये आहे, आपण VJNT एनटी मध्ये आहोत. हैदराबाद गॅझेट नुसार इतर कोणाला फायदा मिळत असेल तर आम्हाला देखील एसटी चा फायदा मिळाला पाहिजे असं ते म्हणाले.
समीर पाटीलवर मकोकासारखी कारवाई, कुणावर गुन्हे दाखल करायचे असतील तर समीर पाटील सांगतो. पुण्यातील गुन्हेगारीवर बोलणं माझं कर्तव्य आहे, तुम्हीमाझ्यावर का घसरता ? धंगेकरांचा भाजपला सवाल
मनसेची शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक, राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक. 11 वाजता शिवतीर्थ येथे ही बैठक होत असून आगामी निवडणुकांची रणनीती हा बैठकीचा मुख्य अजेंडा असणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मनसेचे प्रवक्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार .
निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादवांना मोठा धक्का बसला आहे. IRCTC आणि लँड फॉर जॉबप्रकरणी लालू प्रसाद यादव कुटुंबावरील आरोप निश्चिती झाली आहे.
युती करताना राज ठाकरे काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेविषयी नक्की विचार करतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. कर्नाटकात काँग्रेसने शिवरायांचे पुतळे हटवले, असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.
नाशिक- शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक पवन पवारविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅप सॉंग तयार करत सोशल मिडियावर व्हायरल करून समाजात दहशत माजवल्याचा आरोप आहे. पवन पवार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पवन पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक गंभीर गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं भरदिवसा पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत तिला ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळालं आलं आहे. वनविभागाने या परिसरात ११ पिंजरे लावले होते. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंची भूमिका, निर्णय नाही, असंही ते म्हणाले.
पुण्यातही ठाण्याइतकी जबरदस्त गुंडगिरी आहे. सर्वपक्षीय नेते उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. उद्याच्या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार सहभागी होणार आहेत, अशी माहिती राऊतांनी दिली.
ठाणे पालिकेत लुटमार करणारे हस्तक आहेत. गुंडगिरी मोडून काढा असे आदेश ठाण्यातही दिले पाहिजेत. ठाण्यातील भ्रष्टाचाराविरोधात मनसेसोबत आमचा आज मोर्चा आहे. अजितदादांमुळे पुणे गुंडाचं माहेरघर बनलंय, अशी टीका संजय राऊतांंनी केली.
मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाण्यात मोर्चा होणार आहे. ठाणे पालिका मुख्यालयावर हा मोर्चा होणार आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत हा मोर्चा असणार आहे. राजन विचारे, केदार दिघे, अविनाश जाधव, अभिजीत पानसे या मोर्चात सहभागी होणार आहेत.
खोक्या भोसले याची पत्नी तेजू सतीश भोसले आणि तिचे काही नातेवाईक शिरूर कासार येथील गायरान परिसरात पाल ठोकून राहत होते. तेथे त्यांच्यावर दोन चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी लाकडी दांडे, कुऱ्हाड, तलवार अशा हत्यारांनी अचानक प्राण घातक हल्ला केला. याप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
पालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणे शहर विकास ,घनकचरा ,सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्त्वाच्या पदावर ही काही अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्ष कार्यरत आहेत त्यांच्याही बदल्या करण्याची गरज आहे असे नारायण पवार यांच्या पत्रात म्हटले आहे..
भाजपचे शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांनी लावलेल्या बॅनरवर रवी राणांचा फोटो. भाजप आमदारांच्या फोटोच्या रांगेत रवी राणांचाही फोटो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अमरावतीत आढावा बैठक पार पडणार आहे त्या निमित्ताने बॅनर बाजी करण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची बदली ..जळगावच्या जिल्हाधिकारी पदी झाली आहे.. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे ..रानडे यांनी कार्यभार स्वीकारला..
सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजाप पक्षात दाखल झालेल्या राजवाडेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे. यातील इतर आरोपी अद्यापही फरार असल्याने आजच्या सूनवणी कडे लक्ष. राजवडेच्या पोलीस कोठडीत वाढ होणार का यांकडे लक्ष
रामकुंड परिसरातील वस्त्रांतरगृह पाडण्यावरून उफाळून आले होते वाद. पुरोहित संघाच्या विरोधा नंतर वस्त्रांतरगृह पाडले जाणार की नाही याबाबत होता संभ्रम. मात्र, पुरोहित संघाला पर्यायी जागा देण्याच्या आश्वासना नंतर वस्त्रांतरगृह पाडण्यास सुरुवात
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे… पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे… यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीत लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार असल्याचे समजते…
’मराठी लोक कचरा आहात’ म्हणणाऱ्या महिलेने मनसे पदाधिकाऱ्यांची मागितली माफी… माफी मागितल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांचा काढता पाय… दोघांनीही परस्पराविरोधात पोलिसात तक्रार न करता घेतली माघार… तणावानंतर दोन्ही बाजूंनी तक्रार न करता दोघांनीही घेतली माघार… सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास कल्याण पश्चिम येथील डी मार्ट मध्ये मराठी–हिंदी भाषेवरून पेटला होता मोठा वाद…
जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील ढोबळेवाडी ते रांजणी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर चिखल झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह महिलांचे हाल होत आहे, या रस्त्यावरून दुचाकी वर सोडा पायी देखील चालणं कठीण झाला आहे. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला याबाबत निवेदन दिले आहे मात्र कोणीही दखल घेतली नाही. दरम्यान हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत.
8 ऑक्टोबरला झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी मशीन साठी प्लास्टिक कॅनमध्ये आणलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने काहीजण भाजले होते… याच घटनेतील व्यक्तींचा उपचारादरम्यान झाला मृत्यू… दोबाडी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू… नाशिकच्या सातपूर परिसरात घडली होती घटना
रत्नागिरीत पारा वाढला: रविवारी राज्यात सर्वाधिक ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद… कोकण झाले सर्वाधिक तापदायक: यंदा पहिल्यांदाच विदर्भ-मराठवाड्याऐवजी कोकणात उच्च तापमान…. मुंबईचे तापमान: सांताक्रूझमध्ये ३४.८ अंशावर; डहाणू, अमरावती, चंद्रपुरातही ३३ अंशांवर पारा…. पुढील काही दिवस दिलासा नाही: राज्यात ढगाळ वातावरण कमी; उकाडा कायम राहण्याची शक्यता.