
स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आलं आहे. या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदवला असून त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली होती. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो माध्यमात व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यातील आरोपींना फाशी दिली जावी, अशी मागणी यादरम्यान करण्यात येतेय. आरोपपत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा ९० दिवसांच्या आत तातडीने निकाल द्यावा. अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार,असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिला आहे.
वाल्मिक कराड याला फाशी द्या, अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या विरोधात शिंदे गट रस्त्यावर उतरला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ६१ ‘लाडक्या बहिणींनी’ योजनेचा लाभ नाकारला असून स्वच्छेने प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत.
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या वतीने देवाभाऊ केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
डोंबिवलीत अबू आझमी आणि वाल्मिकी कराड विरोधात शिंदे गटाने आंदोलन सुरु केले आहे. अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात फोटोला जोडे मारून आंदोलन सुरु आहे. अबू आझमी यांचा फोटो जेसीबीखाली टाकून निषेध केला आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आता मनोज जरांगेंनी जहरी प्रतिक्रिया दिली आहे. “उशीरा का होईना कंबरेत लाथ घालून हाकललं आहे. पण राजीनाम्याचा मुंडेंना अजूनही पश्चाताप नाही.त्यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. तसेच त्यांना 302 मध्ये आरोपीही करा.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मुंडेंची आमदारकी देखील काढून घ्यावी” अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे.
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांनीही उपस्थिती दर्शवली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा, आश्वासन देऊनही कर्जमाफी केली नाही ती त्वरित कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप ठेवण्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचं नाव जोडल्यामुळे, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव सतत वाढत होता. अखेर मुंडेंनी राजीनामा दिला असून तो स्वीकारल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता. मी त्यांच्या राजीनाम्याचं स्वागत करते” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला येणार आहे. तसेच संभाजीनगर बीडच्या केजमध्ये मुंडेंविरोधात आंदोलनही केलं जात आहे. धनंजय मुंडेंचे पोस्टरही जाळण्यात आले आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं मुंडेंनी सांगितलं. तसेच काही दिवस उपचार घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिल्याचं मुंडेंनी म्हटलं आहे
धनंजय मुंडे जे काय वागतायत त्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराज, शहाजी राजे यांचे चरित्र वाचावे मराठ्यांचा इतिहास पाहावा. मराठ्यांनी आरक्षण मागायचे नाही तर देश चालवायचा. मराठा समाजाला आपण कोण आहोत हे कळत नाही हे दुर्दैव आहे. त्यांना आपण कोण आहोत हे कळलं तर देशाचे कल्याण होईल, असे संभाजी भिडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे क्रेडिट सरकारने घेऊ नये. धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मोठी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
मला सरकारला विचारायचं आहे तुम्ही म्हणताय नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय… मात्र ज्याने राजीनामा दिलाय तो म्हणतोय तब्येतीमुळे दिला. सुरेश धस म्हणतात ते बरोबर आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेट झाली नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
धनंजय मुंडे यांचा ट्वीट दाखवलं आणि ते ट्विट बघून तर आणि डोकं फिरलं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस कळस किती हा माणूस असू शकतो की या माणसाला काय बोलावं काय बोलावे माणसाला, असा संताप अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.
नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला पाहिजे होता. मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या घरी जावं लागलं हे सर्वात मोठं अपयश आहे, अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. आणखी फडणवीस यांना राजीनामा घेण्यासाठी कोणा कोणाच्या घरी जाणार आहेत हे माहीत नाही. मुंडे झाले आता कोकाटे बाकी आहेत, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हस्ते चे गृह व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना फाशी झाली पाहिजे. घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीमुळे झाली आहे. तर यापूर्वी सुद्धा आपण आरोप केल्याप्रमाणे सातपुडा बंगल्यावरती खंडणी संदर्भात बैठक झाली होती की नाही, याचं धनंजय मुंडे यांनी उत्तर द्यावं, असे आव्हान धस यांनी दिले आहे.
“खंडणी सहन केली जाणार नाही. सरकारने आता पुढे आलं पाहिजे. आम्ही वारंवार दिल्ली दरबारी न्याय मागतोय. हार्वेस्टर घोटाळा करण्यासाठी लोकांनी मतदान केलय का?. नैतिकता होती की डॉक्टरचा सल्ला होता?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
“वाल्मिक कराडच्या जेलमधील कॅमेरे बंद कसे?. अनेक दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागतेय. 84 दिवसानंतर नैतिकता सुचली का?. कृष्णा आंधळे गायब होतोच कसा?. खंडणी प्रकरणी आतापर्यंत ईडीने तपास करायला हवा होता. अनेक दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागतेय” असं सुप्रिया सुळे मीडियाशी बोलताना म्हणाल्या.
“मुख्यमंत्री आता आले दोन ओळीच बोलले की, त्यांचा राजीनामा आला, तो मी स्वीकार केलाय. तो गव्हर्नरकडे पाठवलाय. का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही दोन अडीच महिने हा सगळा तमाशा बघत होतात का? तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही?” असे प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारले आहेत.
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
गेल्या काही महिन्यांत राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे, कधी सरपंचांना सांगतात तुम्हाला फंड देणार नाही, तुम्हाला अधिकार देणार नाही असंही सांगतात. पण हेच सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का ? हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे, पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.
विधानभवन परिसरात विरोधक आक्रमक झाले असून पायऱ्यांवर त्यांचं आंदोलन सुरू आहे. धनंजय मुंडे, कोकाटे यांच्या राजीनाम्याची तसेच अबू आझमींवरील कारवाईची विरोधकांकडून मागणी केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला धनंजय मुंडेंचा राजीनामा, थोड्याच वेळात विधानभवनात होणार घोषणा.
धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांचे पीए हे ‘सागर’ बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पालघर – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार . ट्रक आणि टँकरच्या भीषण अपघातानंतर भीषण आग लागून ट्रक आणि टँकर देखील जळून खाक झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळ ही दुर्घटना घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही मात्र अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली.
अमरावतीत राज्य राखीव दलाच्या बल गट क्रमांक 9 मधील पोलिसांच्या निवासस्थानांमध्ये चोऱ्या… मध्यरात्री चोरट्यांनी जवळपास दहा निवासस्थानी फोडल्याची प्राथमिक माहिती… चांदूर रेल्वे मार्गावरील 500 क्वार्टर मधील घटना.. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास….
सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अपहरण झल्याची माहिती… पुण्यातील बिबेवाडी परिसरातील घटना… २ कोटी खंडणीसाठी पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण… अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करत मागितले 2 कोटी रुपये… संबंधित व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबेवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली आहे… अपहरण झालेल्या व्यापारीची दुचाकी पुण्यातील नवले ब्रिज येथे सापडलीय.. पुणे पोलिसांकडून अपहरण झालेल्या व्यवसायिकाचा शोध घेतला जात आहे…
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर रोहित पवार म्हणाले, ‘पुतण्या म्हणून सांगतो दादांनी आज राजीनामा घेतला पाहिजे… फडणवीसांनी मैत्री कचऱ्यात टाकावी… यापूर्वीच फोटो फडणवीस आणि दादांकडे आले असावेत… गोपीनाथ मुंडे असते तर आज धनंजय मुंडेंना चाबकानं मारलं असतं…’ असं देखील रोहित पवार म्हणाले.
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेबाबत सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यात आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 31 मेपर्यंत मुदत असणार आहे. या आयोगाला राज्याच्या गृह विभागाने आतापर्यंत जवळपास 20 वेळा मुदतवाढ दिली आहे.
“अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाही. जर आज यांचा आता राजीनामा नाही आला, बडतर्फ केलं गेलं नाही.. तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले त्या सगळ्यांना मी हात जोडून निवेदन करते की उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचं आणि यांचा अधिवेशन बंद पाडायचा,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
ठाणे महापालिकेचे 2700 कोटींचे घनकचरा व्यवस्थापन टेंडर रद्द करण्याची मागणी ठाणे काँग्रेसने केली आहे. डबघाईला आलेल्या महानगरपालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द करावी. निविदा प्रक्रिया रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.
“मला राग येत आहे. राजीनामा अजून आहे, अजून राजीनामा आहे. इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा आहे. एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत? असा मंत्री नको हे आदेश का देत नाहीत,” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
देवगिरीवर काल तातडीची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात ही बैठक पार पडली. उद्या राजीनामा द्या, असं फडणवीसांनी काल रात्रीच मुंडेंना सांगितलं.
ड्रग्ज प्रकरणातील मुंबईतील महिला आरोपी संगीता गोळेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संगीता गोळेला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ८ मार्चपर्यंत आता कोठडीत मुक्काम वाढला आहे. तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमधील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्यानं संगीता गोळीच्या कोठडीत वाढ करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्रीच फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगे हे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले आहेत. सांत्वनासाठी आलेल्या मनोज जरांगेंना मिठी मारुन धनंजय देशमुख रडले. हत्येचे फोटो व्हायरल होताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला.