
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा लक्ष्मीपूजनाचा आज मुहूर्त आहे. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. यंदा सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 33 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 60 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली तर भारताला जबर कर देत राहावा लागेल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यावेळी भारत – पाकिस्तानमध्ये मे महिन्यात झालेला संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला. याशिवाय लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विविध व्याधींनी त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.