Ahmedabad Plane Crash News LIVE : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन

Air India Ahmedabad-London Plane Crash News Live Updates in Marathi: अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळले असून, त्यात 242 प्रवासी होते. सध्या बचावकार्य सुरु आहे.

Ahmedabad Plane Crash News LIVE : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 2:32 PM

Air India Ahmedabad-London Plane Crash News Live Updates in Marathi – अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफच्या 10 मिनीटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने दाखल करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jun 2025 07:16 PM (IST)

    विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन

    अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे. रूपाणी हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि देशभरात शोककळा पसरली आहे

  • 12 Jun 2025 05:50 PM (IST)

    अहमदाबाद विमान दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 130 जवान रवाना

    अहमदाबाद विमान दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना युद्धपातळीवर मदतीचे काम सुरू

    भारतीय लष्कराचे 130 जवान रवाना

  • 12 Jun 2025 05:22 PM (IST)

    विमान कोसळलेल्या भागात कुलिंक ऑपरेशन सुरू, नातेवाईकांना भावना अनावर

    विमान कोसळलेल्या ठिकाणी आता कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

    या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आग विझवत आहेत.

    तसेच विमानाचे अस्तव्यस्त झालेले भाग एका बाजूला केले जात आहेत.

    तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

  • 12 Jun 2025 05:12 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघातात युद्धपातळीवर बचावकार्य 

    अहमदाबाद विमान अपघातात युद्धपातळीवर बचावकार्य

    जखमींना रुग्णालयात केलं जातंय दाखल

    विमान वसतीगृहावर आदळले

    20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती.

  • 12 Jun 2025 04:54 PM (IST)

    ही घटना हृदयद्रावक आहे – राहुल गांधी

    अहमदाबाद विमान अपघातावर राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ही दुर्घटना हृदयद्रावक आहे. पीडित कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत. त्याच वेळी सोनिया गांधी म्हणाल्या की संपूर्ण देश शोकात आहे. प्रार्थना करत आहे.

  • 12 Jun 2025 04:49 PM (IST)

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादच्या असारवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले

    एअर इंडिया विमान अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते. पण त्यांच्याबाबत अजून ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादच्या असारवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले, जिथे विमान अपघातातील जखमींना आणण्यात आले आहे.

  • 12 Jun 2025 04:38 PM (IST)

    अपघातानंतर हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आलेत

    • ब्रिटिश नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर- 020 7008 5000
    • अहमदाबाद पोलिस हेल्पलाइन क्रमांक- 7925620359
    • एअर इंडिया हेल्पलाइन क्रमांक- 1800 5691 444
    • नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक- 011- 24610843
    • गुजरात सरकारचा हेल्पलाइन क्रमांक- 079-232 51 900
  • 12 Jun 2025 04:23 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघातानंतर बचाव कार्यासाठी सैन्य तैनात

    अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातस्थळी अनेक एजन्सी बचाव आणि मदत कार्यात सहभागी आहेत, घटनास्थळी धुरासह ढिगारा पसरला आहे. बचाव कार्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. विमान अपघातानंतर सीआयएसएफने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.

  • 12 Jun 2025 04:14 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघाताने मी दुःखी आहे : पंतप्रधान मोदी

    अहमदाबाद विमान अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, या अपघाताने मला दु:ख झाले आहे. मी शब्दात वेदना व्यक्त करू शकत नाही. आम्ही पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. मी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

  • 12 Jun 2025 04:06 PM (IST)

    ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले

    अहमदाबाद विमान अपघाताबद्दल ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, लंडनला जाणाऱ्या या विमानात अनेक ब्रिटिश नागरिक होते. या अपघाताचे दृश्य विनाशकारी आहेत. परिस्थिती जसजशी स्पष्ट होत आहे तसतसे मला अपडेट दिले जात आहेत. या अत्यंत दुःखद वेळी प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.

  • 12 Jun 2025 03:44 PM (IST)

    अपघातग्रस्त विमानात 11 लहान मुलं तर 2 नवजात बालकं

    अहमदाबाद येथे अपघात झालेल्या विमानात एकूण 242 प्रवासी होते. त्यामध्ये 169 भारतीय, 11 लहानमुलं, 2 नवजात बालकं, 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन, 217 प्रौढ आणि 7 पोर्तुगीज प्रवासी होते. तसेच 10 क्रू मेंबर्स देखील होते.

  • 12 Jun 2025 03:40 PM (IST)

    एअर इंडियाकडून आपत्कालीन फोन क्रमांक जारी

    अहमदाबाद येथील प्रवासी विमान अपघातानंतर एअर इंडियाने आपत्कालीन फोन क्रमांक जारी केला आहे. 18005691444 असा हा आपत्कालीन क्रमांक आहे.

  • 12 Jun 2025 03:37 PM (IST)

    नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना

    अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याची बातमी समोर येत आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळले असून, त्यात 242 प्रवासी होते. त्यानंतर नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • 12 Jun 2025 03:18 PM (IST)

    अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात; पंतप्रधान मोदी अन् अमित शाह अहमदाबादच्या दिशेनं रवाना

    अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफच्या 10 मिनीटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले आहे.

     

  • 12 Jun 2025 03:07 PM (IST)

    अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात; युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरु

    अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफवेळी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने दाखल करण्यात आलं आहे.

     

  • 12 Jun 2025 02:54 PM (IST)

    अहमदाबाद विमान अपघाताचे पहिले फुटेज व्हायरल

    अहमदाबाद येथे टेक ऑफ घेतना एअर इंडियाच्या विमानाला  अपघात झाला असून त्याचे  पहिले फुटेज व्हायरल झाले आहेत. विमानात २०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत  होते.

    येथे पाहा फुटेज

  • 12 Jun 2025 02:51 PM (IST)

    जळगावात वादळी पावसाने तीन जणांचा मृत्यू

    जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तीन जणाचा मृत्यू झाला असून 7 तालुक्यांमध्ये आर्थिक नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

  • 12 Jun 2025 02:37 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी अपघातग्रस्त विमानात होते

    अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले असून त्याच १३० हून अधिक प्रवासी होते. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते असे उघडकीस आले आहे.

     

  • 12 Jun 2025 02:28 PM (IST)

    अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असण्याची शक्यता

    अहमदाबादमधील मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफवेळी कोसळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या अपघाती विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. रुग्णांना रुग्णालयात तातडीने दाखल केलं जात आहे.

  • 12 Jun 2025 02:23 PM (IST)

    टेकऑफच्या 10 व्या मिनिटाला अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं; परिसरात प्रचंड धुराचे लोट

    अहमदाबादमध्ये एअरपोर्टजवळ एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफच्या 10 व्या मिनिटाला कोसळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. सरकारी रुग्णालयाजवळच हे विमान कोसळलं आहे.अपघातात काही प्रवासी भाजले गेल्याचंही समजत आहे. जखमींना बाजूलीच सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहे.

  • 12 Jun 2025 02:19 PM (IST)

    अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या अपघातात काही प्रवासी भाजले गेले; जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं

    अहमदाबादमध्ये एअरपोर्टजवळ एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. सरकारी रुग्णालयाजवळच हे विमान कोसळलं आहे.अपघातात काही प्रवासी भाजले गेल्याचंही समजत आहे. जखमींना बाजूलीच सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे.

  • 12 Jun 2025 02:13 PM (IST)

    अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या कोसळलेल्या विमानात 242 प्रवासी होते; बचावकार्य सुरु आहे

    अहमदाबादमध्ये एअरपोर्टजवळ एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. सरकारी रुग्णालयाजवळच हे विमान कोसळलं आहे.

  • 12 Jun 2025 02:07 PM (IST)

    अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल

    अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे विमान कोसळलं आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

  • 12 Jun 2025 01:53 PM (IST)

    उदय सामंतांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे ‘शिवतीर्थावर’

    उदय सामंतांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ दाखल झाले आहेत. तसेच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची कल्पना नसल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

     

     

  • 12 Jun 2025 01:30 PM (IST)

    संदीप देशपांडे आणि उदय यांच्यातही पाऊन तासापासून बैठक

    राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे बैठक सुरु असताना दुसरीकडे संदीप देशपांडे आणि उदय यांच्यातही चर्चा. संदीप देशपांडेंसह अमेय खोपकरही उदय सामंतांच्या भेटीला आले आहेत. पण या दोन्ही बैठकींचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

  • 12 Jun 2025 01:14 PM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा; BMC साठी मोठी बैठक?

    राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं पाहायाला मिळालं. ही बैठक BMC साठी होती का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत. तर याधीही लोकसभेची बैठकही 2101 नंबरच्या रुममध्ये झाली होती. दरम्यान बैठकीत दोन्ही नेत्यांशिवाय दुसरे कोणीही उपस्थित नव्हते.

     

  • 12 Jun 2025 12:59 PM (IST)

    ठाकरे शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन

    क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरे शिवसेनेने नांदेडमध्ये चक्काजाम आंदोलन केले. महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नांदेड – हिंगोली महामार्ग शिवसैनिकांनी रोखून धरला आहे.

  • 12 Jun 2025 12:50 PM (IST)

    वादळी वाऱ्याने जळगावमध्ये नुकसान

    जळगाव जिल्ह्यात काल वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 12 Jun 2025 12:40 PM (IST)

    जालना शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

    जालना शहरातल्या मोतीबाग परिसरामध्ये ठाकरे गटाकडून रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्याहून अंबड आणि बीडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

  • 12 Jun 2025 12:30 PM (IST)

     मुख्यमंत्री यांच्याशी ऑनलाईन बैठक दुपारी – बच्चू कडू यांची माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

  • 12 Jun 2025 12:26 PM (IST)

    संदीप देशपांडे-उदय सामंत यांची भेट

    मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतील आहे. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. पण एकीकडे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर या भेटीने पण अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी अमेय खोपकर सुद्धा हजर होते.

  • 12 Jun 2025 12:20 PM (IST)

    दिलीपकुमार सानंदा आज हजारो कार्यकर्त्यांसह करणार राष्ट्रवादीत प्रवेश

    अजित पवारांच्या नेतृत्वात आज खामगाव मध्ये संकल्प मेळावा होता आहे. सानंदा यांचा आज काँग्रेस मधील 40 वर्षांचा प्रवास थांबणार आहे. मागील काळात काँग्रेस ने भरभरून दिलेय, मी सांगेन ती पूर्व दिशा होती. विलासराव देशमुख असताना मोठा निधी मिळाला.जी विचारसरणी काँग्रेसची तीच विचारसरणी अजित दादांची आहे. माझे कार्यकर्ते सत्तेत जावे, त्यांची काम व्हावी. म्हणून आज दादांच्या राष्ट्रवादीत आज हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करत असल्याचे सानंदा म्हणाले.

  • 12 Jun 2025 12:07 PM (IST)

    राज ठाकरे अजूनही हॉटेलमध्येच

    राज ठाकरे हे अजूनही वांद्रे मधील हॉटेल ताज लँड्समध्ये उपस्थित आहे. या हॉटेलमध्ये त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्त्वाची ठरली आहे.

  • 12 Jun 2025 12:00 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण राज ठाकरे राबवत आहेत

    राज ठाकरे खूप दिलदार व्यक्ती ते बाळासाहेबाचे धोरण राबवतात ती कुठेही कुणालाही भेटतात. राजकीय संबंध असतात कोणाची कुठेही भेट होते. कुठे ठाकरे ची भेट होते कधी उदय सामंतांना ते पोहे खायला बोलवतात. बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण राज ठाकरे राबवत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहेत.

  • 12 Jun 2025 11:30 AM (IST)

    जळगाव – रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला मोठा फटका

    जळगाव शहरात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसला. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती

    पहाटेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पडलेले वृक्ष बाजूला करण्यात आले व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

  • 12 Jun 2025 11:23 AM (IST)

    अमरावती – बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपोषण स्थळी दाखल

    अमरावती – बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपोषण स्थळी दाखल झाले असून बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची चर्चा सुरू आहे.

    बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकही दाखल झालंय.

  • 12 Jun 2025 11:08 AM (IST)

    ठाणे – ठाकरेंच्या शिवसेनेकडून जनता दरबाराला आजपासून सुरुवात

    आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता ठाण्यात जनता दरबाराला अनेक पक्षाकडून सुरुवात झाली असून ठाकरेंच्या शिवसेनेकडूनदेखील जनता दरबाराला आजपासून सुरुवात झाली आहे.

    ठाण्यातील चंदनवाडी येथे शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर हे ठाणे जिल्हा शाखेमध्ये जनता दरबार घेत आहेत. पहिल्यांदाच ठाकरे गटाचा जनता दरबार चंदनवाडी ठाणे जिल्हा शाखेमध्ये भरवण्यात आला आहे

  • 12 Jun 2025 10:56 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट?

    हॉटेल ताज लँड एन्डमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट? राज ठाकरे अर्धा तास आधी हॉटेलमध्ये पोहोचले. फडणवीस आणि राज ठाकरे दोघे देखील सध्या हॉटेलमध्ये…

  • 12 Jun 2025 10:55 AM (IST)

    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांचा आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश..

    आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार ठाण्यात भव्य पक्ष प्रवेश… निलेश सांबरे यांच्या समवेत जवाहर मोखाडा भिवंडी येथील अनेक खेड्या पाड्यातील नागरिकांचाही होणार पक्ष प्रवेश… अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी देखील आपलं नशीब आजमावलं होतं …

  • 12 Jun 2025 10:40 AM (IST)

    संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे नाशिक शहरात आगमन

    काल निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे मुक्काम सातपूर या ठिकाणी होते… आज सकाळी सातपूरहून पालखीचे प्रस्थान झाले… नाशिक शहरातील पंचायत समिती परिसरात पालखीचे स्वागत… पालखीचे स्वागत करण्यासाठी राजकीय नेते आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित…

  • 12 Jun 2025 10:30 AM (IST)

    नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनाच्या वतीने आज शहादा तालुका बंदची हाक….

    बिरसा फायटर या आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंद नंतर सकाळ पासूनच शहादा शहरातील सर्व आस्थापना बंद… कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे… शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या असल्याच्या विरोधात आदिवासी संघटनांनी पुकारला आहे बंद… आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही आहे त्यासाठी शहादा शहर आज बंद… आमदार रघुवंशी यांच्याकडून आदिवासी संघटनांबद्दल अपशब्द वापरला असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला असून त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे….

  • 12 Jun 2025 10:07 AM (IST)

    विधानसभेत मविआला सत्ता मिळणार होती – संजय राऊत

    विधानसभेत मविआला सत्ता मिळणार होती… विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी बोलतात तेच खरं… मविआत जागावाटपात काही जागांवर तेढ निर्माण झाला होता. त्याचा फटका बसला… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केला आहे.

  • 12 Jun 2025 09:58 AM (IST)

    श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे नाशिकमध्ये आगमन

    संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे नाशिक शहरात आगमन झाले आहे. काल निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम सातपूर या ठिकाणी होता. आज सकाळी सातपूरहून पालखीचे प्रस्थान झाले.

  • 12 Jun 2025 09:39 AM (IST)

    माजी आमदार सानंदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षांचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रवेश होणार आहे. यावेळी मतदार संघातील हजारो कार्यकर्ते सुद्धा सानंदा यांच्या सोबत प्रवेश करणार आहेत.

  • 12 Jun 2025 09:21 AM (IST)

    अजित पवार आज अकोल्यात

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आहेत. अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे.  त्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत

  • 12 Jun 2025 09:08 AM (IST)

    राज ठाकरे ठाण्यात येणार

    ठाण्यातील नौपाडा भागात मनसेचे मध्यवर्ती कार्यालयाचा आज दहावा वर्धापन दिन असून सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आली आहे. त्यानिमित्त मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी ठाण्यात कार्याला भेट देत सत्यनारायणच्या महापूजेचे लाभ घेणार आहे.

  • 12 Jun 2025 08:52 AM (IST)

    Maharashtra News : राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे लागले एकत्र बॅनर

    राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे लागले एकत्र बॅनर. मनसे-ठाकरे गट संभाव्य युतीचे नाशिकमध्ये पडसाद. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्रित बॅनर. मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. कार्यकर्ते मनसे-ठाकरे गट युती होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद.

  • 12 Jun 2025 08:49 AM (IST)

    Pune News : पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज

    गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात वादळी वारे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

  • 12 Jun 2025 08:35 AM (IST)

    Pune News : पुण्यात रक्ताच्या पिशव्यांचा तुटवडा

    पुणे शहरात रक्ताच्या पिशव्यांचा तुटवडा. विविध कारणांमुळे रक्तदाते घटले. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहराला दररोज साधारणपणे 1500 रक्त पिशव्यांची गरज असते. सध्या फक्त 300 ते 400 रक्त पिशव्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे दिवसाला हजार ते बाराशे रक्त पिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे

  • 12 Jun 2025 08:33 AM (IST)

    Bacchu Kadu Hunger Strike : उपोषण करणाऱ्या बच्चू कडूंच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट

    प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस. अद्याप अन्नत्याग आंदोलनावर तोडगा नाही. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या माध्यमातून सरकारशी बोलणं सुरु. मात्र अद्यापही सरकारचा एकही मंत्री बच्चू कडू यांना भेट देण्यासाठी उपोषणस्थळी आला नाही. बच्चू कडू यांचे वजन चार किलोंनी घटलं. वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडूंची 24 तासात दोन वेळा तपासणी.