
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला? याची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात एक समिती नेमण्यात आलीय. ही समिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे. निलेश चव्हाणला 2022 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला. पुणे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली हा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर त्या व्यक्तीला मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मंत्रालयात उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर असून दुर्गम भागातील पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. नक्षल विरोधी पोलीस पथकाच्या जवानासोबत अभियानाची माहिती घेणार आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात काही नक्षलवादी आत्मसमर्पण मुख्यमंत्र्यांसमोर करणार आहेत. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा लग्न सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न होणार आहे. दुपारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व तीन आमदार उपस्थित राहणार आहेत.
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना खेड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जेसीबी विक्री करून फसवणूक आणि धमकी प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना अटक केली होती. खेड न्यायालयाने दोघांना 3 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. दोघांची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे महाळुंगे पोलीस दोघांना खेड न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालय पुन्हा पोलीस कोठडी देते की न्यायालयीन कोठडी? याकडे लक्ष असणार आहे.
अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये शनिवारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे. मंत्री शंभुराजे शिंदे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्यादरम्यान अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
“राज्य सरकारने नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी क्षणभरही त्यांच्या पदावर राहू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”, बंगळुरूतील चेंगराचेंगरीबद्दल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. हिंजवडी परिसरातील कासारसाईमध्ये जमिनीच्या वादातून पिस्तुल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कासारसाईमधील मुलांनी कुटुंब आणि अडव्हॉकेट संदीप भोईर यांच्यातगेल्या 14 वर्षापासून वाद सुरू आहे. आज अडव्हॉकेट संदीप भोईर जमिनी ज्या ठिकाणी त्याठिकाणी आले. तेव्हा मुलांनी आणि भोईर यांच्यात वाद झाला. त्यावेळी भोईर यांनी मुलांनी कुटुंबातील सदस्यांना पिस्तुल दाखवून तिथून पळ काढला. हिंजवडी पोलीस घटनास्थळी जात दोघांनाही ताब्यात घेतलं. तसेच पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
हिंजवडी परिसरातील कासारसाईमध्ये जमिनीच्या वादातून पिस्तुल काढून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. येथील मुलाणी कुटुंब आणि अडव्हॉकेट संदीप भोईर या दोघांचा गेल्या 14 वर्षापासून वाद सुरू असून या वादात हा प्रकार घडला आहे.
मी स्वतः कधीही म्हंटलं नाही माझं दुसऱ्या पक्षात जातोय, मी आमिषांना बळी पडलेलो नाही, पोटात एक आणि ओठांवर एक असं कधीही नाही
उद्या राजसाहेब भेट देतील अशी अपेक्षा आहे असे वैभव खेडकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन 10 जून रोजी बालेवाडी येथे साजरा होणार आहे. आम्ही जनतेमध्ये आहोत म्हणूनच आम्हाला लोकसभा विधानसभेत घवघवीत यश मिळाले असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
“ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे ही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं चालू असेल तर ही गोष्ट चांगली आहे,” असं मनसेचे संजय जामदार म्हणाले.
मुंबईतील मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी ED कडून मुंबईतील विविध ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे. कांदिवलीतील आयबीआयएस इमारतीतील मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी जय जोशी यांच्या घरावर ईडीचे छापेमारी अजूनही सुरू आहेत. ईडीचे पथक काल रात्री जय जोशी यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे छापेमारी अजूनही सुरू आहेत.
नवी दिल्ली – कोल्हापूरच्या विशाळगडावरील दर्ग्यावर बकरी ईदला कुर्बानी देण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाने कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून तातडीने सुनावणीची मागणी केली आहे.
आदिशक्ती मुक्ताईची पालखी आषाढी वारीनिमित्त आज प्रस्थान होणार आहे. मुक्ताई मंदिरात मुक्ताईच्या पादुकांचा अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडत आहेत. या पालखी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे उपस्थिती राहणार आहेत.
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात ईडीने अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापे टाकले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून डिनोच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
हगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. पण या कटात बँकेच्या एजंटचा काय सहभाग आहे? हे निश्चित करण्यासाठी आज म्हाळुंगे पोलिसांनी संबंधित बँकेच्या प्रतिनिधींना चौकशीला बोलावलं आहे.
प्रशांत येळवंडे यांनी थकीत कर्ज असलेला जेसीबी हगवणेकडून खरेदी केला. त्यानंतर येळवंडे यांच्या ताब्यातील जेसीबीच्या जप्ती पासून ते शशांक हगवणेच्या ताब्यात हा जेसीबी देण्यापर्यंत संबंधित बँक आणि एजंट यांच्यात कागदोपत्री आणि तोंडी काय संवाद झाला. तसेच हे एजंट्स शशांक आणि लता यांच्या संपर्कात कधी पासून आहेत अन आजवर त्यांनी हगवणेसाठी काय-काय अनधिकृत कामं केलीत? याचं गूढ पोलिसांना उकलायचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असून गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे प्रत्येक मार्गावर नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान सर्चिंग ऑपरेशन करीत आहेत. नक्षलग्रस्त भाग असून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी जवान पोलीस अधीक्षक कार्यालय व कॉम्प्लेक्स भागात श्वास पथकासह सर्चिंग करीत आहेत
आरबीआयने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेपो दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे.
अबुधाबीहून परतलेल्या बिहारच्या ३७ वर्षीय राजकुमार यादवला बनावट रशियन व्हिसा प्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याच्या पासपोर्टवरील रशियन व्हिसा स्टिकरवर संशय आला होता. तपासादरम्यान अल्ट्राव्हायोलेट लाइटखाली व्हिसा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर सहार पोलिसांनी राजकुमार यादवविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५४ पैकी १४ अर्ज बाद झाले आहेत तर १४० उमेदवार रिंगणात आहे. राज्यातील प्रतिष्ठित कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी निवडणूक २९ जून रोजी होणार आहे. त्यासाठी ३ ते १७ जूनदरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत तर १८ जून रोजी चिन्ह वाटप, २९ जूनला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका बसला आहे. या खात्याचा 410 कोटींचा निधी वळवल्याचे समोर आले आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पैशांची जमवा-जमव करताना दमछाक होताना दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळचे युद्धविराम झाले असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी घातला. लोक, खासदार प्रश्न विचारणारच, घाबरता कशाला? असा सवाल राऊतांनी केला.
राज्यातील प्रतिष्ठीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी निवडणूक २९ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत १५४ पैकी १४ अर्ज बाद, १४० उमेदवार रिंगणात आहे.
अबुधाबीहून परतलेल्या बिहारच्या ३७ वर्षीय राजकुमार यादवला बनावट रशियन व्हिसा प्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याच्या पासपोर्टवरील रशियन व्हिसा स्टिकरवर संशय आला होता. तपासादरम्यान अल्ट्राव्हायोलेट लाइटखाली व्हिसा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भीषण अपघात झाला आहे. वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. त्यात शरद वाघ या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थना सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली आहे. कारण प्रस्थान सोहळ्यादिवशीच गुरुवार आला आहे. रोजच्या नीतिनियमानुसार दर गुरुवारी माऊलीची पालखी निघते, त्याला गुरुवार सोहळा म्हणतात, म्हणजेच 19 जून गुरुवार या दिवशी आधी नितीनियमानुसारची पालखी निघणार. त्यानंतर आरती होणार आणि मग पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार. म्हणजेच दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा रात्री 8 पर्यंत सुरू होणार.
गोंदिया तिरोड्यात नियोजित बालविवाह टळला. दामिनी पथकाची तत्पर कारवाई. महिला व बालविकास विभागाची सतर्कता. बालविवाह रोखून पालकांचे समुपदेशन.गोपनीय माहितीवरून तातडीची धाव. दामिनी पथकाने वाचवले अल्पवयीन मुलीचे भवितव्य. बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची माहिती देत पालकांचा निर्णय बदलला. तिरोड्यातील ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजित बालविवाहास आळा.
अहिल्यानगर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची दुचाकी स्वाराला जोरदार धडक. दुचाकी स्वार महामार्गाच्या विरुद्ध बाजूच्या लेन वर जाऊन कोसळत दुसऱ्या कार खाली चिरडला गेलाय. या अपघातात शरद वाघ या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा हा सर्व थरार CCTV कँमेय्रात चित्रीत झालाय.
पुण्यात शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा तपासणीतील निष्कर्ष, मे पासून संसर्गात वाढ. शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याची तपासणी करण्यात येते. दर आठवड्याला 40 ते 60 नमुन्यांची तपासणी होते. या सर्व तपासणीत कोरोना विषाणूचा अंश आढळून आला आहे.