
Maharashtra Breaking News LIVE : राज्यात पावसाचं थैमान सुरूच असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचंही नुकसान झालं. तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे. दुसरीकडे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यावर आज सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर गेल्या होत्या. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून शेती नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना सरनाईक यांनी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं विधान केलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये मिशन ज्ञान कवच या उपक्रमांतर्गत नो मोअर बॅकबेंचर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या संकल्पनेच्या अंमलबजावणीला देखील आता सुरुवात झाली आहे.
आगमी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रशासकीय यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा आढावा आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित तयारीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांची व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभागाला दिले.
आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुस्लिम समाजाचा तरुण अफरोज बशीर बागवान या तरुणाचे अकाली निधन झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या कुटूंबियांची मनोज जरांगे यांनी भेट घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेताची पाहणीही केली.
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात चिमणकर बंधू दोषमुक्त आढळले आहेत. भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. न्यायमूर्ती गडकरी आणि राजेश पाटलांच्या खंडपीठाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे.
बातम्या आणि संघटनांच्या तक्रारीनंतर कोर्टाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत केली होती. SITने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून अंमलात आणण्याचेही कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान ‘वनतारा’ हे जगातील मोठ्या केंद्रापैकी एक आहे.
कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच देणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलं आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्र देताना अधिकाऱ्यानी काळजी घ्यावी अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत
छगन भुजबळांनी शिंदे समितीवर टीका केली आहे. ‘मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये दिले गेले आहेत. पण मराठा समाजाला OBCमधून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाचं नुकसान होतंय.” अशी नाराजी व्यक्त करत छगन भुजबळांनी ओबीसीमधील कोणीही यासाठी आत्महत्या करू नये अशी विनंती केली आहे.
गडचिरोलीत गाय चारनीसाठी गेलेल्या दोन आदिवासींवर अस्वलांच्या भयानक हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे शहरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. आज पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मार्केट यार्डमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
कल्याण मोहने येथील एनआरसीच्या रिकाम्या जमिनीवर अंबुजा सिमेंट फॅक्टरीचा प्रस्ताव मांडण्यात आला. फॅक्टरीमुळे पाणी व हवेचे प्रदूषण होणार, तसेच २० लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असे म्हणत 1000 पेक्षा जास्त लोकांनी दर्शवला विरोध.
वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. येत्या 20 सप्टेंबरला मनसेचा ट्राफिक मार्च मोर्चा ठाण्यातो होणार आहे. सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात मनसे हा मोर्चा काढणार आहे.
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. पण संस्कृतीच्या नावाखाली कोण वेश्याव्यवसाय करत असेल तर ते बंद करावे लागेल असा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. या विरोधात एस पी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आज आदेश दिल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना वाचवणे हे आमचं कर्तव्य शेतकरी जगला तर सर्वसामान्य माणूस जगेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरु आमदार बापूसिंह महाराज यांनी केली. एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही समाजासहित आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची विनंती त्यांनी केली. बोलण्याच्या ओघात धनंजय मुंडे बंजारा वंजारी एक असा उल्लेख केला असावा, असे ते म्हणाले.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिराजगाव कसबा येथे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गावातील रस्त्याना नदीचे स्वरूप आले.अतिपावसाने सोयाबीन,कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला. काही वेळासाठी गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, आमची सत्ता आली की पहिल्या कॅबिनेट मध्ये कर्जमाफी करूय पण आता ते म्हणत आहेत की ओला दुष्काळ जाहीर झाला तर आपण कर्जमाफी करू. हे फडणवीस आता अशी भाषा करत आहेत. कर्जमाफी न झाल्यास 28 ऑक्टोबर ला नागपूर मध्ये महामोर्चा काढणार असे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी इशारा दिला.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेडून हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, सहा प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क, नो पार्किंग आणि नो हॉल्टिंग झोनची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार या रस्त्यांमध्ये जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, बालेवाडीतील हाय स्ट्रीट, विमाननगर आणि बिबवेवाडी येथील मुख्य रस्ता यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. मंत्री मंगलप्रभाग लोढा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जाणार आहे.
पूर्वी उद्धव ठाकरेंवर ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणून टीका करायचे. मात्र आता फडणवीस देखील ऑनलाईन पाहणी करत आहेत, असा चिमटा बच्चू कडू यांनी काढला. राज्यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही.
शेतकऱ्यांचे 93 हजार कोटी सरकारने दिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील अर्निया सेक्टरमधून सुरक्षा दलांनी एके-47 आणि एक पिस्तूल जप्त केले.
राज ठाकरे माझ्या वाढदिवसाला आला होता. मी त्याच्याकडे गणपतीला गेलो होतो. मावशी बोलली होती, असाच येत जा. त्यामुळे आता इतक्या वर्षानंतर भेटीगाठी होत आहे. पुढे काय असेल ते लवकरच कळेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आशिया कप स्पर्धेत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात पाठवलं होतं. तुम्ही नेमकं तिथे काय सांगितलं. कोण करतंय तुमच्याकडे आतंकवाद.. तर पाकिस्तान करतो, असं तुम्ही सांगितलं. तर जगातील इतर राष्ट्र आपल्या पाठी का उभी राहिली नाहीत. पाकिस्तान दहशतवाद करतो आणि तुम्ही सगळं काही विसरून क्रिकेट खेळता. मग तुम्ही शत्रू आहात की मित्र असा प्रश्न इतर राष्ट्र विचारतील, असा झोंबणारा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
राज्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं. कर्ज काढून कामं करत असाल तर त्याला विकास मानत नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
धाराशिवचे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेनेची ताकद वाढत असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अंमलबजावणी संचालनालयाने माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात चौकशीसाठी 22 सप्टेंबर रोजी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
The Enforcement Directorate has summoned former cricketer Robin Uthappa to appear before it for questioning at its headquarters in Delhi on September 22 in connection with the illegal betting app 1xBet case: Officials
(file pic) pic.twitter.com/UfPtS7pOND
— ANI (@ANI) September 16, 2025
राजकीय नेत्यांनी समाजाची दिशाभूल करू नये, असं किरण लहामटे यांनी सांगितलं आहे. आदिवासींमध्ये घुसखोरी झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे वेधशाळेकडून आज पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पावसामुळे काल पुण्यातील विविध भागात पाणी साचलेल्या घटना घडल्या होत्या. एका रात्रीच्या विश्रांतीनंतर पुन्हा पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
परळी तालुक्यातील वानटाकळी , बोधेगाव, मोहा, करेवाडी सह अनेक गावांची बांधावर जाऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सभापती यांच्या सह अनेक अधिकारी सोबत होते.
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर पुणे पोलिसांच्या ताब्यात असून सध्या त्याला समर्थ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 12 जणांना यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. तर आज सकाळी बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर स्वतः पोलिसांना शरण आला आहे. कृष्णा अंदेकरची वैद्यकीय तपासणी करून कृष्णा आंदेकरचा ताबा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे, त्याला आज दुपारी कोर्टात हजर करणार आहेत.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक सुरू झाली असून राज्यातील ओला दुष्काळ याविषयावर चर्चा होणार आहे. ओल्या दुष्काळावर सरकार मदत देण्याच्या तयारीत आहे. कुठे काय नुकसान झालं याचा आढावा घेऊन बैठकीत चर्चा होणार आहे.
उमराणे (नाशिक) – उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू. कांदाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी…
19 प्रभागातून 601 हरकती प्राप्त… आज पासून प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतीची सुनावणी.. पर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत सुनावणी… तीन दिवस चालणार हरकतीवर सुनावणी …
नांदणी चेक पोस्ट येथून रोज किती वाहने जातात याबाबत विचारली माहिती… मात्र मंत्र्यांनी जाब विचारताच आरटीओ अधिकाऱ्याची बोलती बंद झाली… त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्या ठिकाणी वर्दी न घालता वसुली करणारे लोक कोण होते याबाबत लेखी उत्तर मागितले… परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नांदणी चेक पोस्ट येथे भेट देऊन केली पाहणी… त्यानंतर प्रशासनाच्या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्याला घेतले फैलावर
घरात गाडी असल्याचे कारण देत लाडकी बहीण योजनेतून चिपळूण मधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा अर्ज बाद… कौंढर ताम्हाणे येथील धक्कादायक प्रकार… बारा वर्षापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तीन वर्षांच्या मुलीसोबत कच्च्या घरात राहणाऱ्या संगीता तावडे यांची प्रशासनाकडून चेष्टा… ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या…गरजू महिलेची सरकारकला विनंती… माझी आणि माझ्या घराची अवस्था बघा… आमची एकवेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू ? महिलेचा संतप्त सवाल… संगीत तावडे यांचा लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज बाद झाल्याचे पाहून व्यक्त केले जात आहे आश्चर्य…
बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, प्रकल्पाचे एकूण १९ दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामुळे प्रकल्पातून १३२६ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाना पटोले यांनी नुकतंच अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती दिली. राज्याच्या तिजोरीतून पैसे कुठे चालले आहेत, सध्या तिजोरी लुटण्याचं काम सुरु असल्याने राज्यावर बोजा येत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध नाही. जवळपास 56 तास उलटून गेले असले तरी सतीश शिंदे अद्याप ही बेपत्ता आहेत. रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने बोटच्या साहाय्याने देखील सतीश शिंदे यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप सतीश शिंदे यांचा कोणतंही तपास लागलेला नाही. दरम्यान सतीश शिंदे वाहून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते मडकी वस्ती रोडवरील जुना दगडी पूल बंद करण्यात आलाय
जळगावच्या जामनेर तालुक्यात पावसाची मध्यरात्री जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना मोठा पूर आला आहे. जळगाव ते जामनेर महामार्गावर असलेल्या चिंचखेडा गावाजवळ खडकी नाल्याला पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नेरी, चिंचखेडा, पळसखेडा, जामनेर या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे. नेरी गावात देखील पुराचे पाणी शिरल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जामनेर तालुक्यात रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पुर आला आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने त्यातून वाहन काढू नये किंवा धोका पत्करू करू नये असा आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे
गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह बीड शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे. त्यातच बीड शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या जुन्या दगडी पुलावरून गेल्या 24 तासांपासून तीन फूट पाणी वाहत आहे. यामुळे जुन्या बीड शहराचा संपर्क तुटला आहे. तर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रस्त्याचा बराचसा भाग वाहून गेला आहे.
पैठणच्या जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पाऊस पडत असल्याने नाथसागराचे अठरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नाथसागरातून गोदावरी नदी पात्रात 56 हजार पाचशे 92 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे..
शहर व परिसरात पावसाची विश्रांती. सोमवारी दुपारी मध्यम ते तीव्र सरी कोसळल्या. शहराजवळच्या खेड्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे
शेती पिकांना फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तीन तासापासून मुक्ताईनगरच्या सखल भागात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कपाशी तूर उडीद मूंग या पिकांना अति पावसामुळे फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे….
वाहतूक कोंडीचा सामना घोडबंदर वासीयांना करावा लागत आहे. बोरवली ते ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनाचा नागला बंदर ठिकाणी रास्ता रोको. रस्त्यावरती पडलेला खड्ड्यांपासून आजादी अशा प्रकारचा नारा.
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील घुंगर्डे, हदगाव, तीर्थपुरी तसंच आसपासच्या परिसरात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आला आहे. शिवाय मुसा भद्रा नदीलादेखील पूर आल्यामुळे तीर्थपुरी ते गोंदी रस्ता काही काळ बंद झालाय.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढा घातला आहे. सांडस चिंचोली या गावाचा संपर्क तुटला असून सर्व गावकरी गावातच अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढली तर गावातही पाणी शिरण्याची शक्यता आहे.
अंधुक प्रकाशामुळे मुंबईहून आलेलं विमान अमरावती विमानतळावर लँड न होताच मुंबईला परत गेल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीहून मुंबईला जाणारे प्रवासी विमानतळावर प्रतीक्षा करत राहिले. बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेमध्ये अनेक अडचणी येत आहेत.
गोंदिया- जिल्ह्यातील 29 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीने 10 हजार हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं आहे. तर 17 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पुण्यातील वाघोली परिसरातील एका इमारतीतील लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असताना लिफ्ट अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी नाही.
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील आनंदवाडी शिवारात नाल्याच्या पाण्यात 60 वर्षीय इसम वाहून गेला. आनंदवाडी शिवारात पती-पत्नी दोघेही पूल पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून जाऊन लागले. दरम्यान महिलेला झाडाची फांदी मिळाल्याने महिला बचावली, मात्र पती वाहून गेला. तळेगाव पोलिसांकडून पतीचा शोध सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाला आहे. बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हा हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो. एरव्ही दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागले आहेत.
जालना शहरात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचलंय आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी घरात आणि व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरलंय.