Delhi Blast News Live : बिहारमध्ये एक्झीट पोलनुसार एनडीएचं सरकार, जाणून घ्या

Delhi Blast News Live in Marathi :सोमवारी संध्याकाळी दिल्ली इथं झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घ्या..

Delhi Blast News Live : बिहारमध्ये एक्झीट पोलनुसार एनडीएचं सरकार, जाणून घ्या
delhi blast
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Nov 12, 2025 | 8:18 AM

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याचा सदैव गजबजलेला परिसर सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटाने हादरून गेला. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सिग्नलजवळ झालेल्या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरमधील मोहिमेतून घातपाताचा मोठा कट उधळून लावण्याचा दावा तीन राज्यांचे पोलीस करत असताना झालेला हा स्फोट दहशतवादी कृत्य आहे की नाही, याबाबत केंद्र सरकार किंवा तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र १४ वर्षांनंतर दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आज १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. बिहारची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह विरोधी महागठबंधनसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.

सिनेविश्वातून अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, असं कळतंय. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Nov 2025 07:47 PM (IST)

    एनडीएला 138 जागा मिळण्याची शक्यता – चाणक्य

    एनडीए: 130-138

    महाआघाडी: 100-108

    जनसुराज पक्ष: 0-0

    इतर: 3-5

  • 11 Nov 2025 07:46 PM (IST)

    दोन तृतीयांश पेक्षा जास्त जनतेने एनडीएच्या बाजूने मतदान केले – सम्राट चौधरी

    बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, “मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो… आम्हाला विश्वास आहे की बिहारच्या लोकांनी 2/3 पेक्षा जास्त बहुमताने एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे… प्रत्यक्ष अहवाल एक्झिट पोलपेक्षा जास्त असेल आणि आमचा मतांचा वाटा सुमारे 50% असेल असा आम्हाला विश्वास आहे.”

  • 11 Nov 2025 07:38 PM (IST)

    बिहार निवडणुकीबद्दल एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?

    बिहार निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. पीपल्स इनसाइट सर्वेक्षणात एनडीएला 133-148, महाआघाडीला 87-102 आणि जेएसपीला 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे, मॅट्रिक्सने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 147-167 जागा, महाआघाडीला 70-90 जागा आणि जेएसपीला 0-2जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

  • 11 Nov 2025 07:20 PM (IST)

    बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, विधिमंडळ पक्षनेते अहमद खान यांचा राजीनामा

    बिहारमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि कडवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शकील अहमद खान यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शकील अहमद खान हे बिहार प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष आहेत.

  • 11 Nov 2025 07:10 PM (IST)

    बिहारमध्ये एक्झीट पोलनुसार एनडीएचं सरकार, जाणून घ्या

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत बिहारमध्ये कुणाचं सरकार येणार? हे स्पष्ट होईल. मात्र त्याआधी मतदानानंतर आता एक्झीट पोलचे आकडे समोर आले आहेत. विविध Exit Poll चे आकडे पाहता बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

    एक्झीट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार

  • 11 Nov 2025 06:50 PM (IST)

    तपास यंत्रणांकडून लाल किल्ल्याच्या पार्किंगमधील CCTV ची तपासणी

    मोठी बातमी समोर आली आहे. तपास यंत्रणांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमधील CCTV ची तपासणी केली आहे. उमर मोहम्मद हा स्फोटातील गाडीसह लाल किल्ल्याजवळ होता. उमल 3 वाजून 19 मिनिटांनी पार्किंगमध्ये गेला होता. त्यानंतर उमर 6 वाजून 48 मिनिटांनी पार्किंगमधून बाहेर आला होता, अशी माहिती तपासणीनंतर समोर आली आहे.

  • 11 Nov 2025 06:45 PM (IST)

    इगतपुरीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

    इगतपुरीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नगरपालिकेवर गेली तीस वर्ष एकहाती सत्ता मिळवणारे शिवसेना उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजप प्रवेश केला आहे. संजय इंदुलकर उपनगराध्यक्ष नईम खान आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह डोंबिवलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

  • 11 Nov 2025 06:26 PM (IST)

    पुण्यातील स्वारगेट चौकात मराठा समाजाचे आंदोलन

    पुण्यातील स्वारगेट चौकात मराठा समाजाकडून बकासुराची भूक भागवा आंदोलन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा घातपात घडवण्याचा प्रकार उघडकीस आलाय. याचा निषेध करण्यासाठी तसेच सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करावी या मागणीसाठी मराठा बांधवांकडून स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आलं.

  • 11 Nov 2025 06:04 PM (IST)

    बदलापुरात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार

    बदलापुरात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं समोर आलं आहे. जवळपास 25 ते 30 उमेदवार ठरले आहेत. याबाबत उद्या चित्र स्पष्ट होणार. तर दोघांच्या भांडणात आमचाच लाभ होईल, असं खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले.

  • 11 Nov 2025 05:58 PM (IST)

    सांगलीतील नाट्यग्रहांची दुरावस्था

    सांगली : नाट्य पंढरी म्हणून सांगलीची ओळख .आहे नुकतेच रंगभूमी दिन साजरा झाला. मात्र या नाट्य पंढरी सांगलीमध्ये एकही शासकीय नाट्यगृह नाही, महापालिकेचा असणारा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह हे शेवटच्या घटका मोजत आहे. महापालिका क्षेत्रातील नाट्यगृहांची दुरावस्था झाली आहे.
  • 11 Nov 2025 05:28 PM (IST)

    दिल्ली स्फोटानंतर शिर्डीतही भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी

     दिल्लीत झालेल्या बाॅम्बस्फोटाच्या घटनेनंतर‌ साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचीही तपासणी केली जातेय. दर्शनरांगेत जाणा-या भाविकांची तपासणी करूनच त्यांना मंदिरात सोडलं जातंय…
  • 11 Nov 2025 05:14 PM (IST)

    १९ वर्षीय तरुणीने माहीमच्या खाडीत मारली उडी, मित्रानेही केलं धक्कादायक कृत्य!

    मुंबईतील माहीममध्ये १९ वर्षीय तरुणीने माहीमच्या खाडीत मारली उडी आहे. तिने उडी का मारली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्राने देखील खाडीत उडी मारली आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचं शोधकार्य सुरू आहे.

  • 11 Nov 2025 04:55 PM (IST)

    वसई विरार महापालिकेसाठी आरक्षण जाहीर

     

    वसई विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभागाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. 29 प्रभागातील 115 सदस्यांसाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे. 20 नंबरच्या प्रभागात चारही जागांवर एससी, एसटी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.

  • 11 Nov 2025 04:49 PM (IST)

    बीड: भाजपचे नेते भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही घड्याळ हाती घेतले.

  • 11 Nov 2025 04:27 PM (IST)

    सांगली: मिरज रेल्वे जंक्शनवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त

     

    दिल्लीतल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सांगलीच्या मिरज रेल्वे जंक्शनवर देखील पोलीस प्रशासनाकडून मिरज रेल्वे स्थानकावर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर डॉग स्कॉडच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी देखील करण्यात येत आहे .येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून करडी नजर ठेवत कसून तपासणी करण्यात येत आहे.

  • 11 Nov 2025 04:11 PM (IST)

    AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा – प्रताप सरनाईक

    मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

  • 11 Nov 2025 03:50 PM (IST)

    दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    दिल्लीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने देखील अलर्ट जारी केला असून,श्री क्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 11 Nov 2025 03:35 PM (IST)

    भाजप, शिवसेनेची युतीची घोषणा! राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला डावलले

    जळगावच्या पारोळा एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. या युतीमध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आले आहे. आज पारोळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार मंगेश चव्हाण व शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली.

  • 11 Nov 2025 03:25 PM (IST)

    मेघदूत बंगल्यावर महायुतीची समन्वय समितीची बैठक सुरू

    मेघदूत बंगल्यावर महायुतीची समन्वय समितीची बैठक सुरू आहे. बैठकीला प्रत्येक पक्षातील दोन प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकांवर चर्चा सुरु आहे.

  • 11 Nov 2025 03:15 PM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरक्षित जागांची संख्या जाहीर

    पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरक्षित जागांची एकूण संख्या 128 आहे. सर्वसाधारण महिला – 35, इतर मागास प्रवर्ग महिला – 18, अनुसूचित जाती महिला-10, अनुसूचित जमाती महिला – 2 आहेत. एकूण महिला वर्गासाठी 50 टक्के राखीव आहे.

  • 11 Nov 2025 03:00 PM (IST)

    इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीत मोठा राजकीय भूकंप

    गेली तीस वर्ष नगरपालिकेवर एक हाती सत्ता ठेवणारे शिवसेना गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

  • 11 Nov 2025 02:53 PM (IST)

    सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही : पंतप्रधान मोदी

    दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचा इशारा भूतानमधून पंतप्रधान मोदींनी दिला आहे. तसेच ते सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात असल्याचंही मोदींनी म्हटलं

     

  • 11 Nov 2025 02:36 PM (IST)

    पार्थ पवार जमीन प्रकरण; अंजली दमानिया काही कागदपत्रांसह बावनकुळेंच्या भेटीला

    अंजली दमानिया काही कागदपत्रांसह बावनकुळेंच्या भेटीला मेघदूत बंगल्यावर गेल्या आहेत. पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

  • 11 Nov 2025 02:15 PM (IST)

    अखेर कोल्हापुरातील बिबट्याला पकडण्यात यश

    कोल्हापुरात विवेकानंद परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन विभागाच्या पथकाला यश आलं आहे. या बिबट्याने 2 ते 3 जणांवर हल्ला केला होता.

     

     

  • 11 Nov 2025 12:55 PM (IST)

    दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींची भूतानमधून पहिली प्रतिक्रिया

    “तपास सुरु आहे. आम्ही तपासाच्या शेवटापर्यंत जाणार. जे जबाबदार आहेत, त्यांना सोडणार नाही. सरकार प्रत्येक एका गोष्टीचा तपास करत आहे. रिपोर्ट आल्यानंतर कारवाई होईल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 11 Nov 2025 12:48 PM (IST)

    दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर अलर्टवर, भाविकांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम

    दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा आता हाय अलर्ट मोडवर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे देखील पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या मंदिरात केवळ राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने, येथील गर्दीचे आणि संवेदनशीलतेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या वाहनांची आणि वैयक्तिक सामानाची कसून तपासणी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे या धार्मिक स्थळावर विशेष लक्ष आहे.

  • 11 Nov 2025 12:37 PM (IST)

    मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था; दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अलर्ट

    दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे प्रशासनाने तातडीने सतर्कतेचा इशारा देत रेल्वे स्टेशन परिसराची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढवली आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि श्वान पथकाच्या (Dog Squad) मदतीने स्टेशनवर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वे प्रशासनाने स्टेशनच्या संपूर्ण परिसराची, फलाटांवर येणाऱ्या गाड्यांची, पार्सल ऑफिसची तसेच प्रवाशांच्या वेटिंग रूमची कसून पाहणी सुरू केली आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव मिळू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्टेशन परिसरात अधिक सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • 11 Nov 2025 12:19 PM (IST)

    भाजपमध्ये बंडखोरीला नो एंट्री; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 14 तारखेला घोषित होणार

    भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) बंडखोरीला कोणताही थारा दिला जाणार नाही. पक्ष विचारधारेवर चालतो आणि एकदा उमेदवार निश्चित झाल्यावर सर्व कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाच्या कामाला लागतात, असे स्पष्ट मत भाजप आमदार व भंडारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख परिणय फुके यांनी व्यक्त केले. निवडणुका जवळ आल्या की अनेकजण तिकीट मागतात, पण पक्षाने घेतलेला निर्णय अंतिम असतो. जर कुणाची नाराजी झाली तर ती दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न पक्ष करेल, असेही परिणय फुके म्हणाले.

     

  • 11 Nov 2025 12:08 PM (IST)

    मुंबई-आग्रा महामार्गावरील श्री रेणुका देवी मंदिराची सुरक्षा रामभरोसे

    दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिराची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे रामभरोसे असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. साडेतीन पिठांपैकी अर्ध पीठ म्हणून मान्यता असलेले हे प्राचीन मंदिर मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ डोंगररांगांमध्ये आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक रेणुका मातेच्या चरणी लीन होण्यासाठी येत असताना, अशा महत्त्वाच्या आणि संवेदनशील धार्मिक स्थळाच्या सुरक्षेकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे.

  • 11 Nov 2025 12:02 PM (IST)

    बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली.

    बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली.  पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
    आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीने लेखी म्हणणे मांडले. आरोपीचे वकिल शहा गैरहजर असल्याने इतर आरोपींच्या वकीलांच्या विनंतीवरुन दुसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलली. वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर पुढील सुनावणी दरम्यान निर्णय येण्याची शक्यता आहे.

  • 11 Nov 2025 11:33 AM (IST)

    दिल्ली स्फोटातील दोषींना सोडणार नाही – राजनाथ सिंह

    दिल्ली स्फोटातील दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा देणार असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.  लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा अधिक नगारिक जखमी झाले.

  • 11 Nov 2025 11:29 AM (IST)

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली

    अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली.  नाफेड अंतर्गत अजूनही सोयाबीन खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकाव लागते.  नाफेड मध्ये यावर्षी सोयाबीनला पाच हजार 328 रुपये क्विंटल इतका दर आहे तर बाजार समितीमध्ये सोयाबीनला फक्त 3 हजार 4 पर्यंतच दर मिळतोय .  रब्बीची पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने सोयाबीन विकावं लागत आहे

  • 11 Nov 2025 11:10 AM (IST)

    धुळे महानगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत

    धुळे महानगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील शाहू नाट्य मंदिरात आरक्षण सोडत. 19 प्रभागातून 74 सदस्य निवडले जाणार.

     

  • 11 Nov 2025 10:58 AM (IST)

    दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकवर सुरक्षा वाढवली

    दिल्लीला झालेल्या ब्लास्टचे पार्श्वभूमीवर देशासह राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर ही सुरक्षा वाढविली आहे .. येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कसून चौकशी तसेच बॅगेची तपासणी करण्यात येत आहे .. तसेच प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत की संशयित वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास रेल्वे पोलिसांना कळवावे ..

  • 11 Nov 2025 10:45 AM (IST)

    अहिल्यानगर पुणे मार्गावर कामरगाव जवळ गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

    सकाळी सहाच्या दरम्यान स्माईल स्टोन हॉटेल जवळ घडली घटना.. धडक झाल्यानंतर काही काळ बिबट्या जिवंत अवस्थेत होता.. मात्र जबर मारा लागल्याने बिबट्याचा मृत्यू… वन विभागाने घेतलं बिबट्याला ताब्यात… यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती…

  • 11 Nov 2025 10:30 AM (IST)

    कॅनॉलमध्ये पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

    कॅनॉलमध्ये पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू… नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे ही घटना घडली… स्वास्तिक राठोड आणि श्रावणी चव्हाण अशी त्या चिमुकल्यांची नावे आहेत…

  • 11 Nov 2025 10:19 AM (IST)

    एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसोबत युती केलेला संभाजी ब्रिगेड पक्ष ठाकरे गटाची सोडणार साथ- सुत्र… शिंदे यांच्या सेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करणार युती… विकासाच्या मुद्यावर शिंदेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष युती करण्याच्या तयारीत – सुत्र… यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांचा आज मुंबई मध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश…

  • 11 Nov 2025 09:50 AM (IST)

    दिल्लीतील घटनेनंतर राज्यभरातील धार्मिक तिर्थस्थळे हायअलर्टवर

    राजधानी दिल्लीतील अतिमहत्वाच्या लाल किल्ला परिसरात स्फोट. दिल्लीतील घटनेनंतर राज्यभरातील धार्मिक तिर्थस्थळे हायअलर्टवर. शिर्डी साई मंदिर परिसरातील सुरक्षा देखील अलर्ट. बॉम्ब शोधक पथक , पोलिस कर्मचारी , एमएसएफ जवान तसेच मंदिर सुरक्षा विभागातील कर्मचा-यांची तैनाती. मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक भाविकाची कसून तपासणी…

  • 11 Nov 2025 09:40 AM (IST)

    जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रास्ता रोको सुरू

    घटनास्थळी स्थानिका कडून जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रास्ता रोको सुरू -जासई-उरण ते आळंदी दिंडी -७ तारखेला निघाले होते. सव्वाशेच्या आसपास वारकरी होते दिंडीत,आज सकाळी कामशेत येथून पुन्हा आळंदीकडे निघताना रस्ता क्रॅास करतीना अपघात

     

  • 11 Nov 2025 09:30 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरामध्ये हाय अलर्ट

    दिल्ली येथे लाल किल्ल्या समोर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना सुरक्षेच्या कारणास्तव अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरामध्ये कडक सुरक्षा असलेले पाहायला मिळत आहे.

  • 11 Nov 2025 09:20 AM (IST)

    अमरावती कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी…

    कारागृह प्रशासनाचा कैद्यावर अंकुश नसल्याची चर्चा यापूर्वीही कारागृहात कैद्यांजवळ सापडले होते मोबाईल फोन. अमरावतीच्या कारागृहातील अत्यंत सुरक्षित समजल्या अंडा बॅरेक मध्ये काही दिवसांपूर्वी आयफोन अँड्रॉइड फोन व बॅटरी सापडल्याची घटना घडली.आता या कारागृहात कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पुढे आली आहे.बॅरेक क्रमांक १३ मध्ये कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून, या घटनेत अनेक कैदी जखमी झाले आहेत.

     

  • 11 Nov 2025 09:10 AM (IST)

    बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल

     

  • 11 Nov 2025 08:55 AM (IST)

    पुढच्या महिन्यात धर्मेंद्र यांचा वाढदिवस

    येत्या डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.  धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत.

  • 11 Nov 2025 08:50 AM (IST)

    बॉलिवूडचे महान अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक

    बॉलिवूडचे महान अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते 89 वर्षांचे आहेत.

  • 11 Nov 2025 08:32 AM (IST)

    विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचं तापमान सर्वात कमी

    गोंदिया – विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचं तापमान सर्वात कमी नोंदवलं गेलंय. गोंदिया जिल्ह्याचं किमान तापमान 10.4 अंशांवर पोहोचलं आहे. थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

  • 11 Nov 2025 08:27 AM (IST)

    दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी

    पिंपरी चिंचवड- दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावत नाकाबंदी सुरू करण्यात आली. रात्रीच्या सुमारास वाहनांची कसून चौकशी देखील करण्यात आली.

  • 11 Nov 2025 08:25 AM (IST)

    धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

    प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. 1 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सलमान खान, शाहरुख खान, सनी देओल, बॉबी देओल धर्मेंद्र यांना भेटून गेले. तर हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.

  • 10 Nov 2025 09:49 PM (IST)

    Delhi Blast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दु:ख व्यक्त

    दिल्लीतील ब्लास्ट प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दु:ख व्यक्त केले आहे. ज्यांच्या या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांबाबत सहवेदना व्यक्त करत यातील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन केली आहे.

  • 10 Nov 2025 08:59 PM (IST)

    दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला – पोलीस सूत्र

    दिल्लीतील कारमध्ये झालेला स्फोट हा प्रथमदर्शनी दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रीया दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

  • 10 Nov 2025 08:48 PM (IST)

    दिल्ली स्फोट प्रकरणात पोलीसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

    दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.  या स्फोटात एक इको कार सावकाश जात होती.त्यात प्रवासी बसलेले होते आणि त्यातच ब्लास्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  • 10 Nov 2025 08:02 PM (IST)

    दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू

    दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 10 Nov 2025 07:53 PM (IST)

    आम्हाला जोरदार आवाज आणि आम्ही पाहण्यासाठी उतरलो, प्रत्यक्षदर्शींची माहिती

    “मी माझ्या घरातून आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि नंतर काय झाले ते पाहण्यासाठी खाली आलो. मोठा स्फोट झाला. मी जवळच राहतो,” असे स्थानिक रहिवासी राजधर पांडे यांनी सांगितलं.

  • 10 Nov 2025 07:40 PM (IST)

    दिल्लीत कार स्फोटात एकाचा मृत्यू

    दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. पण हा स्फोट कशामुळे झाला हे कारण मात्र अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 10 Nov 2025 07:29 PM (IST)

    स्फोटामुळे जवळ पार्क असलेल्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या

    दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाला. त्यामुळे जवळच्या पार्क केलेल्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोट झाला तेव्हा मोठी गर्दी होती. दोन ते तीन जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील सीएनजीमुळे स्फोट झाला की इतर काही कारणामुळे हे अद्याप समजलेले नाही.

  • 10 Nov 2025 07:23 PM (IST)

    कारमध्ये मोठा स्फोट झाल्याने घबराट, कारण अस्पष्ट

    दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याने घबराट पसरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचं प्रयत्न सुरु आहेत.

  • 10 Nov 2025 07:19 PM (IST)

    दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

    दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला.हा स्फोट कशामुळे हे मात्र अस्पष्ट आहे.

  • 10 Nov 2025 07:16 PM (IST)

    बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया कंपनी, तेजवाणींचा संबंध नाही- पोलीस

    बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया कंपनी आणि तेजवाणींचा संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना अप्रत्यक्षरित्या क्लीनचीट देण्यात आली आहे. एकाच एफआयआरमध्ये दोन प्रकरणे असल्याने गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • 10 Nov 2025 07:03 PM (IST)

    दिल्ली: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई

    दिल्ली पोलिसांच्या पश्चिम श्रेणीने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर मोठी कारवाई सुरू केली. “ऑपरेशन क्लीन स्वीप” अंतर्गत 260 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली. द्वारका, पश्चिम आणि बाह्य जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. 25 हून अधिक घरमालकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.

  • 10 Nov 2025 06:54 PM (IST)

    वसई सत्र न्यायालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी अखेर पुन्हा पोलिसांनी पकडला

    वसई सत्र न्यायालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपी अखेर पुन्हा पोलिसांनी पकडला

    अर्ध्यातासाच्या आत पुन्हा आरोपी जेरबंद, आरोपी पळाल्यानं उडाला होता गोंधळ

    अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वसई न्यायालयात आरोपीला करण्यात आलं होतं हजर

    टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांना चकवा देत आरोपी पळाला

    पोलिसांनी पुन्हा अर्ध्यातासामध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या

  • 10 Nov 2025 06:44 PM (IST)

    बीड: ओंकार सहकारी साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ

    बीड: ओंकार सहकारी साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ

    शुभारंभाला मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती

    भाषणावेळी पंकजा मुंडे भावूक

    कारखान्याच्या अनेक आठवणींना दिला उजाळा

  • 10 Nov 2025 06:40 PM (IST)

    गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर

    गुरुवारी 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा

    जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे होणार उद्घाटन

    उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मोठी जाहीर सभा

    मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

     

     

     

  • 10 Nov 2025 06:24 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील बीडच्या माजलगावमध्ये दाखल

    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडच्या माजलगावमध्ये दाखल

    मनोज जरांगे पाटील हे माजलगाव येथील मराठा सेवक स्व. राजेंद्र होके पाटील यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी दाखल

    माजलगावमध्ये जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार शोकसभा

    प्रदीर्घ आजारामुळे मराठा सेवक राजेंद्र होके पाटील यांचं निधन

     

    .

  • 10 Nov 2025 04:55 PM (IST)

    पल्लवी पुरकायस्था हत्या प्रकरण: सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा कायम

    बहुचर्चित वकील पल्लवी पुरकायस्था हत्या प्रकरणातील आरोपी सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. पल्लवीचे वडील आणि महाराष्ट्र सरकारची आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. आरोपी सज्जाद पठाणला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावली जावी यासाठी याचिका करण्यात आली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

     

  • 10 Nov 2025 04:42 PM (IST)

    बिहार विधानसभा: दुसऱ्या टप्प्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. चेक नाक्यावर पोलिसांकडून गाड्यांची चेकिंग केली जात आहे. कुठल्याही प्रकारचे पैसे, दारू याची वाहतूक होते का याचा शोध घेतला जात आहे. सोबतच सगळ्या गाड्यांच्या क्रमांकांची नोंद ठेवली जात आहे.

     

  • 10 Nov 2025 04:30 PM (IST)

    बीड – काळकुटेंना धमकी देणाऱ्याला अटक करा – धनंजय मुंडे

    गंगाधर काळकुटे यांना धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत काळकुटे यांना माझे नाव घेऊन धमकी देणाऱ्या शेळके नामक कोणीतरी व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याला चांगलाच खाक्या दाखवाव्यात अशी सूचना केली आहे.

  • 10 Nov 2025 04:15 PM (IST)

    अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू

    प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

  • 10 Nov 2025 03:55 PM (IST)

    पुणे पोलिसांचे निलेश गायवळ प्रकरणी ईडीला पत्र

    निलेश गायवळ प्रकरणी मोठी अपडेट. पुणे पोलिसांचे निलेश गायवळ प्रकरणी ईडीला पत्र. निलेश गायवळ च्या बेनामी संपत्ती आणि आर्थिक व्यवहाराचा ईडी कडून तपास होणार आहे. गायवळने पुण्यासह जामखेडमध्ये ६० पेक्षा अधिक जमीन व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

  • 10 Nov 2025 03:40 PM (IST)

    बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

    कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील घटना. शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला. शांताबाई निकोले वय 60 अस मयत महिलेच नाव. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • 10 Nov 2025 03:30 PM (IST)

    आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबतीत हेमंत क्षीरसागर यांनीच स्पष्टता दिलीये. आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश निश्चित होतोय. विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपा बरोबर जात असल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय.

  • 10 Nov 2025 03:20 PM (IST)

    सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1 लाख 21 हजार 300 तर चांदीचे दर 1 लाख 52 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे

  • 10 Nov 2025 03:04 PM (IST)

    फाटकी नोट घेतली नाही म्हणून पेट्रोल पंप चालकावर तलवार उगारल्याची घटना

    फाटकी नोट घेतली नाही म्हणून पेट्रोल पंप चालकावर तलवार उगारल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या बोधले नगर परिसरात ही घटना घडली आहे. तलवार काढून पेट्रोल पंप चालकाला धमकी दिल्याचा व्हिडिओ आला समोर आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांकडून संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

  • 10 Nov 2025 02:40 PM (IST)

    अजितदादांच्या NCP मधील पदाधिकाऱ्याचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

    अजितदादांच्या NCP मधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी अन् उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

  • 10 Nov 2025 02:11 PM (IST)

    मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं ठाणे पालिकेत आंदोलन

    ठाण्यात मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं आहे. ठाणे पालिकेत हे आंदोलन करण्यात आलं आहे. अविनाश जाधवांसह पवारांच्या NCPचे मनोज प्रधानही या आंदोलनात सहभागी झाले होते.

     

     

  • 10 Nov 2025 01:57 PM (IST)

    डोंबिवली मध्ये भाजपला मोठा धक्का

    भाजपचे माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांनी केला शिंदेच्या शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश. माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी केला शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश. माझ्या विभागात विकास काम होत नसल्याने मी भाजप मध्ये नाराज. स्थानिक भागातुन मला निधी दिला जात नव्हता असं विकास म्हात्रे म्हणाले.

  • 10 Nov 2025 01:42 PM (IST)

    राष्ट्रवादी आणि भाजपची युतीबाबत नाशिक मध्ये चर्चा

    राष्ट्रवादी आणि भाजपची युतीबाबत नाशिक मध्ये चर्चा. समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिक येथे चर्चा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत दोघांमध्ये चर्चा. भाजप आणि राष्ट्रवादीची नाशिक मध्ये युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष.

  • 10 Nov 2025 01:32 PM (IST)

    बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

    कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील घटना. शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला. शांताबाई निकोले वय 60 अस मयत महिलेच नाव. आज सकाळची घटना. महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक. नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत केला संताप व्यक्त. आठवडयातील दुसरी घटना. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना तर आमदार आशुतोष काळे यांचा अजीत पवारांना फोन.

  • 10 Nov 2025 01:19 PM (IST)

    मी स्वत: निवडणूक लढवणार नाही – करुणा मुंडे

    मी स्वत: निवडणूक लढवणार नाही. स्वराज्य शक्ती सेना निवडणूक लढवणार. अनेक गैरप्रकरणांची माझ्याकडे यादी आहे. महाराष्ट्र 80 वर्ष मागे गेलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं करुणा मुंडे म्हणाल्या.

  • 10 Nov 2025 01:17 PM (IST)

    करुणा मुंडे यांचा पक्ष उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

    करुणा मुंडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. त्यांची स्वराज्य शक्ती सेना निवडणूक लढवणार. आज नव्या पक्षाची गरज आहे. एकदा संधी देऊन बघा, मी लोकांना आवाहन करते असं करुणा मुंडे म्हणाल्या.

  • 10 Nov 2025 12:55 PM (IST)

    रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. तर रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

  • 10 Nov 2025 12:48 PM (IST)

    सांगली- विटा इथं भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

    सांगली- विटा इथं भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतीला ही आग लागली होती. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • 10 Nov 2025 12:37 PM (IST)

    MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी

    शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये काल 2 वेळा फोनवरून संवाद झाला. MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. यादरम्यान पवारांनी फडवणीसांची भेट घेतली आहे.

  • 10 Nov 2025 12:27 PM (IST)

    धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक

    धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा आणला आहे. कांद्याला मात्र 150 रुपये क्विंंटलपासून 700 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळतोय. कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका हेक्टरला पन्नास हजार रुपये खर्च लागत असताना कांद्याला दीड ते सात रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

     

  • 10 Nov 2025 12:15 PM (IST)

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मिळाली धमकी

    “मी अमेरिकेला असताना मला अतिशय खात्रीने एका सूत्रांकडून कळालं होतं की तुमच्या जीवाला धोका आहे. म्हणजे त्यांची जी भाषा होती ती तुमचा गेम करायचा आहे, अशी होती. ज्या दिवशी जरांगे पाटलांना धमकी आली त्याच दिवशी मला वाटतं मलाही यांचा फोन आला होता. धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे लोक आहेत. तुम्ही काळजी तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा. तुमचे फोन बंद ठेवा. अतिशय सीनियर व्यक्तींकडून मला माहिती मिळाली आहे,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.

  • 10 Nov 2025 11:59 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शरद पवार दाखल

    MCA  कार्यकारिणी निवडणुकीवरून मोठ्या घडामोडी , शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.  काल दोघांमध्ये  फोनवरून 2 वेळा संवाद झाला होता.

  • 10 Nov 2025 11:36 AM (IST)

    मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार

    मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा

  • 10 Nov 2025 11:29 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  पोलिसांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यांच्या सुरक्षेत वाढ का करण्यात आली त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

  • 10 Nov 2025 11:27 AM (IST)

    जालन्यातील महेश आडे आत्महत्या प्रकरणात एका संशयित आरोपीला आष्टी पोलिसांकडून अटक

    जालन्यातील महेश आडे आत्महत्या प्रकरणात एका संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी अटक केली . आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

    महेश आडे या तरुणाने रेल्वेच्या बोर्डाखाली लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केली होती.  परतूर तालुक्यातल्या आष्टी पोलिसांकडून फरार असलेल्या 6 आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

  • 10 Nov 2025 11:18 AM (IST)

    मुंबईत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा – संदीप देशपांडे

    मुंबईतही मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा. 1 ते 28 फ्लॅट असलेल्या इमारतीमध्ये 455 घर क्रमांक कसा ? संदीप देशपांडे यांचा सवाल

  • 10 Nov 2025 11:11 AM (IST)

    मतदार यादीतील घोळ आणि बोगस नावा संदर्भात मनसेच्या वतीने ठाण्यातील बॅनर

    मतदार यादीतील घोळ आणि बोगस नावा संदर्भात मनसेच्या वतीने ठाण्यातील नितीन कंपनी येथे बॅनर लावण्यात आले.  निवडणूक आयोगाच्या डोळ्याला काळीपट्टी सत्ताधाऱ्याने लावत दुबार नाव शोधण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करत असल्याचं, बॅनरच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.. मनसे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर
    यांच्या वतीने बॅनर लावण्यात आले.

  • 10 Nov 2025 10:54 AM (IST)

    ठाणेकरांनो लक्ष द्या, उथळसर आणि नौपाडा भागात आज 24 तास पाणी बंद

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभाच्या नवीन कामामुळे, तसेच कोलबाड परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीच्या स्थलांतरणाच्या कामासाठी शहराच्या काही भागात आज (सोमवार, १० नोव्हेंबर २०२५) २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

  • 10 Nov 2025 10:48 AM (IST)

    वाशिम बाजार समितीत सोयाबीन दराचा उच्चांक, इतिहासात प्रथमच ३० हजार क्विंटलहून अधिक आवक

    वाशिम: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला आहे. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बीजवाई उन्नती वाणाला तब्बल ८ हजार ५३० रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. दरांमध्ये झालेली ही मोठी वाढ पाहता, वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी आणले आहे. याच कारणामुळे, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच काल सायंकाळपासून तब्बल ३० ते ३२ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे.

  • 10 Nov 2025 10:37 AM (IST)

    नाशिकमध्ये मनसे-काँग्रेससह विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद; निवडणुकीची रणनीती ठरणार

    नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये आज (सोमवार) विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, ज्यात मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), कम्युनिस्ट पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, वरिष्ठ स्तरावर काँग्रेसकडून मनसे युतीबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असतानाही, नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र पत्रकार परिषद घेत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या पत्रकार परिषदेत प्रमुख पदाधिकारी निवडणुकीची रणनीती आणि पुढील भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे, वरिष्ठ पातळीवरील विरोध झुगारून स्थानिक पातळीवर हे पक्ष एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, नाशिकच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

  • 10 Nov 2025 10:29 AM (IST)

    पुणे हादरले! आंबेगावमध्ये एकाच वेळी तीन बिबटे; थोरादळे गावात दहशतीचे वातावरण

    उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत कायम असून, आंबेगाव तालुक्यातील थोरादळे गावात एकाच वेळी तीन बिबटे फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. या तीन बिबट्यांमुळे येथील दहशत अधिकच वाढली आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर उभे राहिले आहे.

  • 10 Nov 2025 10:18 AM (IST)

    नाशिकमध्ये पारा घसरला, शहरात गुलाबी थंडीचे आगमन

    उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिक शहरात यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक शहरात पारा १०.८ अंश सेल्सियसवर तर जिल्ह्यातील निफाडमध्ये तो ९.५ अंश सेल्सियसवर घसरला आहे. पारा अचानक घसरल्यामुळे नाशिककरांना सध्या गुलाबी थंडीची अनुभूती मिळत आहे. या आल्हाददायक थंडीमुळे सकाळच्या वेळी शहरातील अनेक मैदानांवर नागरिक कसरतीसाठी आणि व्यायामासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • 10 Nov 2025 10:06 AM (IST)

    भंडारा हादरला, आर्म ॲक्टच्या आरोपीला पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट; जप्त केलेली पिस्तूल ठाण्यातच हाताळतानाचा Video Viral

    भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आर्म ॲक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेल्या तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांना पोलीस ठाण्यात ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याचे उघड झाले आहे. गौपाले हे पोलिसांसमोरच जप्त केलेली पिस्तूल बिनदिक्कतपणे हाताळत असल्याचे आणि फिर्यादीच आरोपीसोबत ठाण्यात झोपल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गंभीर प्रकारामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • 10 Nov 2025 09:55 AM (IST)

    नाशिक महापालिकेसाठी उद्या प्रभाग आरक्षण जाहीर होणार

    मंगळवारी ११ नोव्हेंबरला नाशिक महापालिकेसाठी निघणार आरक्षणाची सोडत. महाकवी कालिदास कलामंदिरात काढली जाणार सोडत. नाशिक महापालिकेसाठी ६२ जागा सर्वसाधारण, ३३ जागांवर ओबीसी तर ६१ जागा महिलांसाठी असणार राखीव. तर अनुसूचित जाती १८ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ०५ जागा राखीव. उद्या होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष

  • 10 Nov 2025 09:50 AM (IST)

    भोरच्या आमदारांच्या भावाने कला केंद्र केलेल्या गोळीबार प्रकरणात,शस्त्र परवाना रद्द

    परवानाधारी शस्त्राचा गैरवापर केला जात असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 2 परवानाधारी पिस्तूलाचा परवाना केला रद्द. दोन्ही परवानाधारकांनी इतर व्यक्तींच्या जीवास व सुरक्षितेच धोका निर्माण होईल असे कृत्य करून परवाना दिलेल्या शास्त्राचा गैरवापर केला त्यामुळे हे शस्त्र रद्द करण्यात आले आहेत

  • 10 Nov 2025 09:30 AM (IST)

    जिल्हा परिषद प्रशासनाकडून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीला वेग

    जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख निश्चित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार (दि. १३) रोजी सकाळी ११.३० वाजता होणार उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित. जिल्हा परिषद प्रशासनाकडून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीला वेग. कुंभमेळ्याच्या कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

     

  • 10 Nov 2025 09:10 AM (IST)

    ” एक अकेला सबसे भारी” अशा अशयाच्या तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्याकडून पोस्ट व्हायरल

    आमदार तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी दौऱ्या दरम्यान शिवसेना सुद्धा एकटी लडेल असे केले होते वक्तव्य. भूम परंडा तालुक्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी दोन दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या घेतल्या बैठका. भूम, परंडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना येणार आमने सामने. तुम्ही कितीही एक व्हा एक अकेला सबसे भारी” अशा आशयाच्या सोशल मीडिया वरती पोस्ट व्हायरल

  • 10 Nov 2025 08:58 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला…

    गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे… गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वांत कूल झालं आहे. गोंदियात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे…