TV9 Marathi Poll : आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केला तर खरंच चुकलं? जाणून घ्या जनतेचं मत

कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं होतं. त्यामुळे आशा सेविकांसमोर (Asha Worker) मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.

TV9 Marathi Poll : आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केला तर खरंच चुकलं? जाणून घ्या जनतेचं मत
आशा सेविकांना रबराचं लिंग का दिलं? तालुका वैद्यकिय अधिकारी म्हणतात, जनजागृतीसाठी!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 7:29 PM

मुंबई : बुलडाण्यात कुटुंबनियोजनासाठी (family planning) समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागाने दिलेल्या किट्समध्ये रबरी लिंग देण्यात आलं होतं. त्यामुळे आशा सेविकांसमोर (Asha Worker) मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे त्यावर महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकारावर सडकून टीका करत सरकारचं (Maharashtra Government) डोकं ठिकाण्यावर आहे, का असा संताप व्यक्त केला होता. तर, आरोग्य विभागाने मात्र या प्रकाराचं समर्थन केलं होतं. आशा सेविकांना दिलेली किट्स जनजागृतीसाठीच आहे, असं आरोग्य विभागाने त्यावेळी म्हटलं होतं. तसेच अशा प्रकारचं किट्स दिल्याने लैंगिक आजार सुद्धा कमी होतील, असा दावाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला होता. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या प्रकाराचं समर्थन केलं असलं तरी महिला वर्गातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने आरोग्य विभागाला रोषाला सामोरे जावं लागण्याची शक्यता अधिक बळावली आहे. महिलांच्या प्रश्नसंदर्भात नेहमीच एकजीव असणाऱ्या समाजसेविकांनी सुद्धा या किटवर आक्षेप घेतला आहे. आशा वर्करांना ही किट घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करणे अवघड झालं आहे. कारण ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असते. महिलांच्या घरी गेल्यावर लहान लहान मुले असतात. पुरूष मंडळी असतात. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बोलणे अवघड असतं, असं समाजसेविका डॉ. तबस्सुम हुसैन यांनी सांगितलं. यावर आम्ही जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

यूट्यूबवरील टीव्ही 9 मराठीचा पोल काय सांगतो?

आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केला तर खरंच चुकलं? हा प्रश्न आम्ही यूट्यूब पोलद्वारे प्रेक्षकांना विचारला होता. साधारण 7 तासात 28 हजार 125 प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं. त्यात 52 टक्के लोकांनी आरोग्य जनजागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केल्याचा निर्णय चुकला असल्याचं म्हटलंय. तर 34 टक्के लोकांनी आरोग्य जनजागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर योग्य असल्याचं म्हटलंय. 14 टक्के लोक मात्र सांगता येत नाही, असं म्हणत आहेत.

YOUTUB POLL

एमआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा यूट्यूबवरील पोल

यूट्यूब कम्युनिटीचा पोल

यूट्यूब कम्युनिटीवरही आम्ही हाच प्रश्न विचारला. 7 तासात तब्बल 31 हजारापेक्षा अधिक प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं. त्यात तब्बल 62 टक्के आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केला तर खरंच चुकलं? या प्रश्नला उत्तर देताना आरोग्य जनजागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर हा निर्णय चुकल असल्याचं म्हटलं आहे. तर 31 टक्के लोकांना आरोग्य जनजागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर योग्य असल्याचं वाटतंय. 7 टक्के लोक मात्र सांगता येत नाही असं म्हणत आहेत.

Youtube Community

एमआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा यूट्यूब कम्युनिटीवरील पोल

ट्वीटरवरील पोल

ट्वीटरच्या पोलवर आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा 2 हजार 200 पेक्षा अधिक लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यामध्ये 47.3 टक्के लोकांनी आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर केल्याचं चुकलं असल्याचं म्हटलंय. तर 40.5 टक्के लोकांनी आरोग्य जागृतीसाठी रबरी लिंगाचा वापर योग्य असल्याचं म्हटलंय. 12.2 टक्के लोक मात्र सांगता येत नाही, असं म्हणतायेत.

मआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा ट्वीटरवरील पोल

इतर बातम्या

Rashmi Thackeray Brother: कुणी कुणाचा पैसा कसा वळवला? रश्मी ठाकरेंच्या भावाची EDनं सांगितलेली Modus Operandi

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’, पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

जागतिक जलदिनादिवशीच पाण्यासाठी भटंकती; दौंडमधील जिरेगावकर पाण्यासाठी फोडताहेत टाहो…

Non Stop LIVE Update
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.