AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? गुप्त बैठकीचे फोटो समोर, पडद्यामागे मोठ्या हालचाली; लवकरच…

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत.

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? गुप्त बैठकीचे फोटो समोर, पडद्यामागे मोठ्या हालचाली; लवकरच...
sharad pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2025 | 3:46 PM
Share

NCP Alliance : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याला जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. सत्तेत बसण्यासाठी युती आणि आघाड्यांचे गणित आखले जात आहे. महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी त्या-त्या शहराची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, आता एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय गोटात तशा हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या गुप्त बैठकांचे काही फोटोदेखील समोर आले आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाची शक्यता आहे. याच युतीवर चर्चा करण्यासाठी संभाजीनगरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाली आहे. शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन आणि अजित पवार गटाचे अभिजित देशमुख यांनी एकत्र येत युतीसंदर्भात चर्चा केली आहे. बैठकीचे काही फोटोही बाहेर आले आहेत. एमआयएमला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले पाहिजे असे अजितदादा गटाचे अभिजित देशमुख यांना वाटते. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी चांगल्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे मत शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सत्तेत यायचे असेल तर युती करणे गरजेचे

छत्रपती संभाजीनगरात एमआयएम या पक्षाचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत सत्तेचा सोपान मिळवायचा असेल तर एमआयएमला रोखणे गरजेचे आहे. यासह एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या पक्षाचीह चांगली ताकद छत्रपती संभाजीनगरात आहे. त्यामुळे सत्तेत यायचे असेल तर युती करणे हाच एक मार्ग असल्याचे येथील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सध्या आता एक गुप्त बैठक झाली असून भविष्यात नेमके काय काय? होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेमकी काय जादू होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.