महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार? उदय सामंत यांच्याकडून महत्वाची माहिती

महाविद्यालयाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार? उदय सामंत यांच्याकडून महत्वाची माहिती

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे (Uday Samant on online exams amid Corona).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 24, 2020 | 9:56 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे (Uday Samant on online exams amid Corona). विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना झाल्यानंतरच या परीक्षांवर निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. तसेच विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही केलं. ते आज सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला.

उदय सामंत म्हणाले, “विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे. आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरु आहे. ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल. तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.”

कोरोना चाचणी प्रयोगशाळा

कोरोनाच्या चाचणी करण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरु झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले आहे. ते लवकरच 5 रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करु शकतील. हा अभ्यासक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देईल, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हिड-19 साठी देऊन सहकार्य करावे असं, आवाहनही सामंत यांनी केलं. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचे सर्व सदस्य आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरु यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित बातम्या :

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

दहिसर येथे माहेरी 1 महिना मुक्काम, भिवंडीत परतलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग

Nitin Gadkari Exclusive | देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

Uday Samant on online exams amid Corona

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें