संभाजी महाराजांबद्दल बोलताना उदयनराजे पुन्हा भावूक, म्हणाले बदनामी आणि षडयंत्राचा…

उदयनराजे आज पुन्हा भावूक झाल्याचे पहायला मिळाले. राजेंचे हे भावूक रुप कार्यकर्त्यांना क्वचितच दिसतं. खासदार उदयनराजें भोसले यांच्या वाढदिवसाच्या (Udayanraje birthday) निमित्ताने उदयनराजे मित्र समुहाने साताऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय.

संभाजी महाराजांबद्दल बोलताना उदयनराजे पुन्हा भावूक, म्हणाले बदनामी आणि षडयंत्राचा...
उदयनराजे भोसले पुन्हा इमोशनल
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 3:46 PM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) आपल्या हटके स्टाईलनं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये (Udayanraje Collar style) प्रिय आहेत. मात्र हेच उदयनराजे आज पुन्हा भावूक झाल्याचे पहायला मिळाले. राजेंचे हे भावूक रुप कार्यकर्त्यांना क्वचितच दिसतं. खासदार उदयनराजें भोसले यांच्या वाढदिवसाच्या (Udayanraje birthday) निमीत्ताने उदयनराजे मित्र समुहाने साताऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय. कोविड नियमांमधून थोडी सुट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. काल झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजेंनी संभाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर झालेल्या बदनामीचा आणि षडयंत्रांचा निषेध केला, यावेळीच राजे भावूक झाल्याचे दिसून आले.

राजेंनी दिला आठवणींना उजाळा

संभाजीराजेंबद्दल बोलताना उदयनराजे म्हणाले, संभाजीराजेंची बदनामी ज्यांनी केली त्यांनी माझ्या समोर व्यासपिठावर येऊन चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिलं आहे. संभाजीराजेंबद्दल बोलताना यावेळी उदयनराजे भावूक झालेले पहायला मिळाले. व्यासपीठावरुन उदयनराजेंनी संभाजी महाराजांबद्दल उपस्थितांना भावनिक साद घालत इतिहासातील मुख्य घटनांना उजाळा दिला. राजेंच्या कार्यकर्त्यांनी राजेंना आजपर्यंत नेहमी जोशमध्ये असणारे, हसते-खेळते राजे बघितले आहेत. मात्र राजेंची ही बाजू कार्यकर्त्यांना फार कमी पहायला मिळते. याआधीही काही वेळा राजे भावनिक झाले आहेत.

शिवजयंतीलाही गहिवरले होते

दोन दिवसांपूर्वीच सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भावूक झाले. मी त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो, तर धन्य झालो असतो, असं उदयनराजे यांनी म्हटलंय. त्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) याचे डोळे पाणावले होते. शिवजयंतीनिमित्त एकत्र आलेला जनसमुदाय पाहून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचा इतिहासच्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी ते भावूक झाले होते. यानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजे गहिवरले होते. आजकाल राजेंची ही वेगळी बाजू कार्यकर्त्यांना पुन्हा दिसू लागली आहे. एकाच आठ्वड्याच्या आत राजे दुसऱ्यांदा भावूक झाल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्याही चेहऱ्यावर निराशा दिसून आली.

महाराष्ट्राचे रूपडे बदलणाऱ्या समृद्धी महामार्गाचे मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेले खास किस्से!

Video – Maha-Infa Conclave | टेडा सेंटरचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सांगितलं लाभाचं गणित

2024 च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच जाळं टाका, जयंत पाटलांनी आगामी निवडणुकांचा प्लॅन आखला

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.