2024 च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच जाळं टाका, जयंत पाटलांनी आगामी निवडणुकांचा प्लॅन आखला

सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम आणि विचारमंथन करण्यासाठी बैठका घ्या. पक्ष वाढविण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवा. त्यांच्या अडीअडचणीला धावून जा. ते तुम्हालाच तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडतील असा कानमंत्र जयंत पाटील यांनी दिला आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच जाळं टाका, जयंत पाटलांनी आगामी निवडणुकांचा प्लॅन आखला
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:39 PM

सोलापूर : आगामी निवडणुका (Elections 2022) लक्षात घेऊन राज्यातले सर्वच पक्षाचे बडे नेते आता मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रभर दौरे करत प्रत्येक जिल्हा पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही दंड थोपटले आहेत. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम आणि विचारमंथन करण्यासाठी बैठका घ्या. पक्ष वाढविण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करा. गोरगरिबांचे प्रश्न सोडवा. त्यांच्या अडीअडचणीला धावून जा. ते तुम्हालाच तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडतील असा कानमंत्र जयंत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद (Ncp Sawad Yatra) यात्रेतील आजच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सोलापूर ग्रामीणच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हलवून जागं करण्यासाठी हा परिवार संवाद दौरा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, शहर फिरत आहोत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आत्तापासूनच जाळं टाका

आपला पक्ष सर्व स्तरावरील लोकांचा विचार करत आहे. विद्यार्थी संघटनेला विद्यार्थ्यांचे जाळे निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. हीच संघटना 2029 ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची खरी ताकद असेल असेही जयंत पाटील म्हणाले. आपल्याला 2024 तर निवडणूक जिंकायचीच आहे मात्र २०२९ च्या निवडणुकीची पक्षाला आतापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी नवतरुणांचे एक जाळं निर्माण करा असे आदेशही जयंत पाटील यांनी यावेळी दिला. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवायचे असेल तर आपल्याला मिळालेली प्रत्येक सीट निवडून आणायला हवी त्यासाठी बुथ कमिट्यांवर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला हे यश मिळेल असेही जयंत पाटील म्हणाले. बीडने जास्त आमदार दिले आहे, नाशिकने जास्त आमदार दिले आहे. त्याचप्रमाणे सोलापूरही सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ शकतो. त्यापद्वतीने पाऊले टाका असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

या संवाद यात्रेला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कल्याणराव काळे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, उत्तमराव जानकर, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर हुसेन शेख, अरुण आजबे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!

Video – Maha Infra Conclave टाटांच्या पुढाकाराने 1.75 हजार लोकांना रोजगार देणारं संकूल नवी मुंबईत उभं राहणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

दिशा सालियानच्या कुटुंबाला डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची हात जोडून विनंती!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.