AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय शाह यांनी गावातील तरुणाची विकेट काढावी…उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना थेट आव्हान

Uddhav Thackeray Rally: जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावातील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहीत नाही. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडला नाही? मग त्यांना अध्यक्ष का केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जय शाह यांनी गावातील तरुणाची विकेट काढावी...उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना थेट आव्हान
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 09, 2024 | 1:55 PM
Share

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरु केला आहे. आपल्या प्रचारातून उद्धव ठाकरे राज्यातील महायुती सरकारला लक्ष करत आहे. त्याचवेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ले करत आहेत. आता त्यांनी अमित शाह यांच्या मुलगा जय शाह यांच्यावर हल्ला केला. जय शाह यांना कोणत्या निकषावर बीसीसीआयचे अध्यक्षपद दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

महिलांना तीन हजार रुपये देणार

आमचे सरकार आल्यावर महिलांना दीड हजार नाही तर तीन हजार रुपये देणार आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल. आम्ही फक्त मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले होते. आता पुन्हा कर्जमुक्त केले असते. परंतु त्यांनी आमचे सरकार पाडले. महायुती ठेकेदारांचे पोट भरत आहे. तो विकास आम्हाला नको आहे.

जय शाह यांच्यावर हल्ला

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मागील वेळेस म्हटले होते की, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. परंतु मी अमित शाह यांना विचारतो, जय शाह यांना क्रिकेटमधील काय माहीत आहे. मी आव्हान देतो, जय शहा यांनी गावातील तरुणांची विकेट काढून दाखवावी, मग त्यांना बीसीसीआय नाही तर कुठेही अध्यक्ष करा, माझा विरोध असणार नाही.

जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावातील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहीत नाही. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडला नाही? मग त्यांना अध्यक्ष का केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.