AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladaki Bahin Yojana : सत्ता आली तर लाडक्या बहिणींना किती पैसे? उद्धव ठाकरेंनी सांगितला नवा आकडा

उद्धव ठाकरे यांची नांदेडच्या लोहा इथे प्रचार सभा पार पडली, या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ladaki Bahin Yojana : सत्ता आली तर लाडक्या बहिणींना किती पैसे? उद्धव ठाकरेंनी सांगितला नवा आकडा
उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 09, 2024 | 3:40 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडच्या लोहामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.  गद्दार आहेत , माझ्यावरती आरोप करतात विचार सोडले , विचार सोडले नाही, निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा. केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन लढता. त्यांच्या युतीत ईडी , सीबीआय , आहेत . माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता, आता तेवीस तारखेला तुम्हालाही जनता तडीपार करणार आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. पुढची सत्ता आमची येणार आहे, तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

यांनी आपली शिवसेना चोरली, या चोरांच्या हातात, गद्दारांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का?  नांदेडमध्ये शिवसेनेनं खूप मेहनत केली. वसंतराव मला भेटले होते, तेव्हा त्यांनी नांदेडमध्ये मला सभा घेण्याची विनंती केली. मात्र दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत. पण आता त्यांचा वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. आघाडी धर्म आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला माझं आव्हान आहे, आमचे उमेदवार तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणतो. खेचा खेची झाली तर नुकसान होईल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. आर एस एसला मला विचारायचं आहे, 100 वर्ष झाले तुमच्या संघटनेला  पण तुम्ही काय केलं? आता त्यांना कळालं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हव. माता भगिनीला पंधराशे रुपये द्यायला पाहिजे. पण पण पंधराशे रुपयांमध्ये तुमचं घर तरी चालतं का? तुमचे पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत की, महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 देणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील हल्लाबोल केला. आता मोदी आणि अमित शाह हे येत आहेत, आता महाराष्ट्रात निवडणूक आहे. सगळे उद्योग तुम्ही लुटून गुजरातला नेले, अन् आता मत मागत आहेत असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.