AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून राज आणि मी एकत्र आलो… उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं कारण?

आझाद मैदान येथे विनाअनुदानित शिक्षकांच मोठं आंदोलन सुरु आहे. आधी शरद पवार यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. मग उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन संवाद साधला. यावेळी भाषण करताना आपण आणि राज ठाकरे का एकत्र आलो, त्यामागच कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

म्हणून राज आणि मी एकत्र आलो... उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं कारण?
| Updated on: Jul 09, 2025 | 1:25 PM
Share

“विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढत आहेत. तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कुणाचं लक्ष नव्हतं. तुम्ही अडगळीत पडला, तसे धारावीकर होते. आता धारावी अदानीच्या घशात घातली. 1600 एकर मुंबईची जागा अदानीच्या घशात टाकली. मिठागरं, देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातलं” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे बोलत होते.  “आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. पूर्वीच्या काळात संप झाला. जे काही ठरलं होतं. ते गिरणी कामगारांना दिलं नाही. कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. ज्यांनी मुंबई मिळवून दिली. त्यांना शेलू आणि वांगणीला पाठवलं. आमची ठाम मागणी आहे. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या. आणि अदानीचे टॉवर शेलू आणि वांगणीला बांधू द्या. देवनार डंपिंगवर अदानीला टॉवर बांधू द्या” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“गिरणी कामगार, पोलीस आणि सफाई कामगारांना हक्काची जागा द्या. ज्यांच्यावर मुंबई आहे त्यांना हक्काची जागा द्या. आपलं सरकार आलं नाही. नाही तर तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज पडली नसती. काही वेळेला डोळ्यावर पट्टी बांधली जाते” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू?

“आम्ही दोन्ही भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं

“आता उभे राहिलो. जो जो मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे धीर सोडू नका. हिंमत हरू नका. शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं आणि धारावीत आपला गिरणी कामगार आलाच पाहिजे, ही मागणी घेऊन यायचं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा. तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. हे वचन देतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.