AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द…उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात देण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द...उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray
| Updated on: Aug 11, 2025 | 1:31 PM
Share

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. आता या आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. राज्यात क्रिडा नाही तर रमी मंत्री असल्याचे त्यांनी म्हणत जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्हात आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय ज्या तुम्ही घोषणा दिल्या, पण त्यांना डोकं असलं पाहिजे ना. कारण हे बिनडोक्याचे फक्त पाय आहेत. सुरतला पळून जायला आणि गुहाटीला पळून जायला. डोकं कुठे आहे? नुकतं खोकं आहे डोकं नाहीच. डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते फक्त खोके घेऊन बसले आहेत. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू आहे आणि आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत.

या जुलूमशाहीच्या विरोधात आता जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल. लाज एका गोष्टीची वाटते, आपण दरवेळी सांगतो की, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र. नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. असा गाैरवशाली आपला महाराष्ट्र या आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे. बाकी भ्रष्टाचाराच्या रांगेत एक नंबरला आहेत. जर भ्रष्टाचाराची रांग लावली तर पहिल्या नंबरला. पण विकास आणि नितीमत्ता पाहिले तर महाराष्ट्र शेवटच्या रांगते.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, अरे खरोखर लाज वाटते तुमची आम्हाला…आजपर्यंतची परंपरा आहे की, जर कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चाैकशीला सामोरे जावे लागते. मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी एका मंत्र्यावर वाईट आरोप होते, तो कोण हे तुम्हालाही माहिती आहे. त्याला सुद्धा वनवासात पाठवले ना? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळी पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले ना. आता यांचे पैसे गिळणारी भूक आहे, जनताभी मूक नाहीच.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.