AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा, आज एक जण येऊन गेला…, अमित शाहांच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा हल्लाबोल

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते, त्यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं भूमीपूजन झालं, यावरून आता उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा, आज एक जण येऊन गेला..., अमित शाहांच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 7:34 PM
Share

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा सुरू आहे, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या हस्ते मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाचं भूमीपूजन झालं, यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे, आज एक जण येऊन गेला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?  

आज भाजप असेल मिंधे असेल त्यांच्याकडे पैसा आहे. पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत. त्या दिवशी, दसरा मेळाव्याच्या दिवशी पाऊस पडत होता. पाऊसमध्ये जाणवत होता, मध्येच जाणवत नव्हता. तुमचा प्रतिसाद एवढा की पाऊसही फिका पडला. पावसामुळे काही जण फटक्यातून वाचले. नाही तर आणखी फटकावणार होतो. विभाग प्रमुखांना नेहमी भेटतो. शाखाप्रमुखांच्या मिटिंग घ्यायचो. पण उपशाखाप्रमुखांची बैठक घ्यावी ही इच्छा होती. त्यामुळे ही बैठक घेतली. ती आता सभाच झाली आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गटप्रमुखांशी बोलणार आहे. उपविभागप्रमुखांकडे तीन शाखा येतात. शाखा प्रमुखाकडे महापालिका वॉर्ड येतो. उपशाखाप्रमुखांकडे दोन ते तीन मतदार याद्या येतात. आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील  मतदार याद्यातील घोळ दाखवले आहेत. आपल्याला हे काम महाराष्ट्रात करायचं आहे. मुंबईतून सुरुवात करायची आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन,  आत बातमी आहे, जिजामाता उद्यानात अ‍ॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अ‍ॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आज अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....