आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन

लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले.

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन
लातूर येथील जाहीर सभेत संबोधित करताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 5:19 PM

लातूर : संबंध देशभर रस्ते बांधणीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले. आता पर्यंत या रस्त्याबाद्दल अनेकांनी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. मात्र, आता खुद्द रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांनीच आश्वासन दिल्याने या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास लातूरकरांनाही वाटू लागला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 752 वर देशात प्रथमच मलेशियन ड्युरा हे तंत्रज्ञान वापरुन पूल बनविण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लातूरमध्ये दाखल झाले होते. मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठा प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक दिवसांपासून रखडले लातूर-टेंभुर्णी रस्त्याचे काम

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावड्याला जोडणारा हा लातूर – टेभूर्णी मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम हे रखडेले आहे. या रस्त्याच्या कामाचे आश्वासने देऊन अनेकांनी निवडणुकाही जिंकल्या. मात्र, रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मात्र, यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीच ह्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आवश्यक असलेले वार्षिक नियोजनही तातडीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लातुर, उस्मानाबाद,बार्शी-कुर्डवाडी या शहरांना पुणे-मुंबईशी जोडण्यासाठी लातुर ते टेंभुर्णी हा रस्ता फोर-लेन करण्यात यावा अशी मागणी लोकांमधून सातत्याने होत आहे. या अरुंद आणि खड्ड्यांच्या रस्त्यांवर आता पर्यंत अनेकांनी अपघातात आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इंधनाच्या जागी इथेनॅालचा वापर करा

पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी आता इथेनॅालचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॅालची निर्मिती होते. बायोमास पासून सीएनजीही तयार होते. मात्र, याचे उत्पादन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल. काळानुरुप एवढा बदल होणे गरजेचे आहे की शहरात उदरनिर्वाहसाठी गेलेल्या तरुणांना त्यांच्या गावीच रोजगार मिळावा हीच माझी प्रमाणिक इच्छा असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.