AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत APMC मध्ये बोगस कोडचा वापर, कोट्यवधींचा महसूल बुडाला, सायबर क्राईमकडे तक्रार, पाहा नेमका काय प्रकार…?

एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये बोगस कोडचा वापर करून बाजार समितीचा महसूल बुडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. | navi Mumbai APMC

नवी मुंबईत APMC मध्ये बोगस कोडचा वापर, कोट्यवधींचा महसूल बुडाला, सायबर क्राईमकडे तक्रार, पाहा नेमका काय प्रकार...?
Navi Mumbai APMC
| Updated on: Mar 07, 2021 | 4:56 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये बोगस कोडचा वापर करून बाजार समितीचा महसूल बुडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गेली 15 वर्षांपासून बोगस कोडने शेतमालाची नोंद केली गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मुंबई एपीएमसी चे सभापती अशोक डक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असून नवी मुंबई सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Use of bogus code in APMC in Navi Mumbai)

बोगस कोडचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या व्यापारी आणि एपीएमसी कर्मचारी कडून बुडलेल्या महसुलासाठी धडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्केटमध्ये व्यापार करण्यासाठी १४०० व्यापारी असून त्यांना कोड नंबर देण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त बोगस वापरण्यात येणारे जवळपास १५००० कोड रद्द करण्यात आले आहेत. तर बुडवण्यात आलेल्या महसुलाची वसुली करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

पंधरा वर्षात बाजार समितीचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला

भाजीपाला मार्केटमध्ये शेतमाल विक्री करणारे 936 गाळे असून 1400 विक्री परवाने आहेत. त्यानुसार 1400 कोड असणे अपेक्षित आहेत पण प्रत्यक्षात मात्र 15 हजार कोड असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे 13 हजार 600 कोड हे बोगस असून या कोडचा वापर करून शेतमाल मागविला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भाडेतत्वावर देण्यात आलेल्या 50 ते 60 टक्के गाळ्यांच्या नावावर बोगस कोडद्वारे शेतमाल मागविण्यात येत होता. त्यामुळे मार्केटमधील व्यापारी आणि कर्मचारी यांनी मिळून मागील पंधरा वर्षात बाजार समितीचा करोडो रुपयांचा महसूल बुडवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

50 ते 60 टक्के गाळे भाडे तत्वावर

मार्केटमधील गाळा मालकाने गाळा विकल्यास त्याचा परवाना रद्द करणे नियमानूसार बंधनकारक आहे. परंतू असे परवाने रद्द करण्यात आले नाहीत. शिवाय मार्केट मधील ५० ते ६० टक्के गाळे भाडेतत्वार आहेत. परंतू बाजार समिती नियमानूसार गाळे भाड्याने देता येत नाहीत आणि दिल्यास बाजार समिती परवाना रद्द करणे बंधनकारक आहे.

सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार उपसचिव सुनील सिंगतकर यांनी कोड रद्द करण्याची कारवाई केली. यापूर्वी जो कर्तव्यदक्ष अधिकारी कारवाई करत असे त्याला बदलीला सामोरे जावे लागत होते. कोरोना काळात बाजार फी वसुली अथवा इतर कामे दिवसरात्र करणाऱ्या आणि अनाधिकृत व्यापाऱ्यांकडून फी वसूल करण्याचे काम उपसचिवांनी केले आहे.

महसूल लाखोंनी वाढला

बाजार समितीच्या महसूलात वाढ झाली असून प्रत्येक दिवसाला तीन लाख रुपये उत्पन्न वाढले आहे. शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून महिना 80 ते 90 लाखापर्यंत गेला आहे.

सभापती अॅक्शन मोड मध्ये

खर्च कमी उत्पन्न वाढवणे हा आमच्या संचालक मंडळाचा निर्धार आहे. भाजीपाला मार्केटमध्ये 1200 ते 1300 व्यापारी असून कोड मात्र पंधरा हजार होते. बोगस वापरण्यात येणारे कोड रद्द केले आहेत. शिवाय सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या दिवसापासून सेस वाढण्यास सुरवात झाली असून महिन्याला 30 ते 40 लाखांची वाढ महसुलात झाल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.

(Use of bogus code in APMC in Navi Mumbai)

हे ही वाचा :

नवी मुंबई मार्केट परिसरात झुंबड गर्दी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर अ‍ॅक्शन मोडमध्ये

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.