AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर जरांगेंवर संतापले, केला अडचणीत टाकणारा सवाल; नेमकं काय घडतंय?

आरक्षणाचा आम्ही तुकडाच पाडून येणार आहोत, अशी टोकाची भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे यांनी मुंबईत येण्याचे ठरवल्यामुळे आता राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना अनेक महत्त्वाचे सवाल विचारले आहेत. तुम्ही गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? असा रोखठोक सवाल त्यांनी केलाय.

प्रकाश आंबेडकर जरांगेंवर संतापले, केला अडचणीत टाकणारा सवाल; नेमकं काय घडतंय?
prakash ambedkar and manoj jarange patil
| Updated on: Aug 25, 2025 | 10:42 PM
Share

Prakash Ambedkar Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत धडक मारणार आहेत. मुंबईत येऊन आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. आता काहीही झालं तरी आम्ही मागे फिरणार नाही. आरक्षणाचा आम्ही तुकडाच पाडून येणार आहोत, अशी टोकाची भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे यांनी मुंबईत येण्याचे ठरवल्यामुळे आता राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना अनेक महत्त्वाचे सवाल विचारले आहेत. तुम्ही गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? असा रोखठोक सवाल त्यांनी केलाय.

तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी…

मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यासारखे प्रस्थापित मराठा नेते आहेत. असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका

ॲड. आंबेडकर म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते. तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, अशी थेट टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

मनोज जरांगे नेमकं काय उत्तर देणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का? असा सवालही ॲड. आंबेडकरांनी जरांगे यांना विचारला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगे नेमके काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा