अवकाळी पावसाचा फटका: भाज्यांचे भाव घसरले; कांद्याचेही मोठे नुकसान

धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. शहरातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.

अवकाळी पावसाचा फटका:  भाज्यांचे भाव घसरले; कांद्याचेही मोठे नुकसान
Vegetable-Image
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 9:44 AM

पुणे- राज्यभर पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. शहरातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.

काय आहेत भाज्यांचे भाव

पुणे मार्केटयार्डमध्ये मटार 20 रुपये किलो, मिरची 10 ते 12 रूपये किलो, बीट 20 रुपये, काकडी 20 रुपये, गाजर 15 रुपये किलो,कोथिंबीर 6 ते 7 रुपये,मेथी 8 ते 10 रुपये, पालक 15 रुपये, वांगी 25 ते 30 रुपये किलो आहेत. मागील आठवड्यात ८० ते १०० किलो असलेला टोमॅटो 25 ते 30 रुपये किलोवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाचे भाव गडाडल्याने शेतमाल अत्यंतकिरकोळ भावत विक्री सुरु केली आहे.

कांद्याचेही मोठे नुकसान पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांद्याचे लिलाव होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस आल्याने हे नुकसान झाले असून खेड बाजार समितीकडे कांदा ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने यात कांदा उत्पादक शेतकरी भरडला आहे.

पाळीव जनावरांचेही मोठे हाल 

काल दिवसभर पाऊस आणि थंड हवेची लाटेमुळं जनावरांना थंडीची बाधा होत जनावरे आजारी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी थेट गोठ्यात शेकोट्या पेटवून आपल्या बैलजोडी आणि जनावरांना ऊब निर्माण करावी लागत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाड्याना पळणाऱ्या बैलांची संख्या आणि बैलगाडा मालकांची मोठी संख्या आहे. या सर्व बैलगाडा प्रेमींनी गोठ्यात शेकोटी पेटवली आहे.

आफ्रिकेतून ठाण्यात 27 जण आले, सर्वाधिक नवी मुंबईत, आरोग्य विभाग अलर्टवर, 42 जणांचा शोध

रायगडावर पर्यटकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु

Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.