कार किंवा बाईक घ्यायचीय का? इतक्या पैशाने स्वस्त… जीएसटी कपात होताच खरेदीसाठी झुंबड
GST Impact on Vehicle Sales: आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील वाहन बाजार तेजीत आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गाडी खरेदी करण्यासाठी अनेकांनी शोरूममध्ये गर्दी केली आहे. केंद्र करकारने काही दिवसांनध्ये GST मध्ये कपात केली होती. या कपातीमुळे संपूर्ण राज्यात टू व्हीलर आणि फोर व्हीलर च्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ दिसत आहे.

केंद्र करकारने काही दिवसांनध्ये GST मध्ये कपात केली होती. या कपातीमुळे संपूर्ण राज्यात टू व्हीलर आणि फोर व्हीलर च्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ दिसत आहे. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील वाहन बाजार तेजीत आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गाडी खरेदी करण्यासाठी अनेकांनू शोरूममध्ये गर्दी केली आहे. जीएसटी कपातीचा निर्णय वाहन व्यवसायासाठी कसा फायदेशीर ठरतोय ते जाणून घेऊयात.
दिवाळी आणि जीएसटी रकमेत झालेल्या कपातीचा परिणाम म्हणून राज्यभरामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर च्या विक्रीमध्ये यावर्षी विक्रमी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळीसाठी सरासरी टू व्हीलर विक्री मध्ये 50 टक्क्यांनी तर फोर व्हीलर च्या विक्रीमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. वाहनांच्या शोरूम मध्ये अजूनही बुकिंग साठी आणि टेस्ट ड्राईव्ह साठी गर्दी होत असल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नुकताच जीएसटी मध्ये कपात केली आहे. याचा परिणाम म्हणून टू व्हीलरच्या किंमती वीस ते पंचवीस हजारांनी तर फोर व्हीलर च्या किमती 70 हजार ते दीड लाखापर्यंत कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला ग्राहक नवीन वाहन खरेदी करताना दिसत आहेत.
आपल्याला माहिती आहे की, दसरा, दिवाळी आणि गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर टू आणि फोर व्हीलर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असते. या काळात वाहनांच्या विक्रीमध्ये दरवर्षी किंचित वाढ होत असते. मात्र यंदा जीएसटी कपात आणि कंपन्यांनी लावलेल्या ऑफर्स मुळे यावर्षी ग्राहकांकडून बुकिंग वाढलं आहे. त्यामुळे झालेल्या बुकिंगच्या प्रमाणात वाहने उपलब्ध होतील की नाही अशी शंका आता शोरूम चालक व्यक्त करत आहेत
दरम्यान यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर टू व्हीलर च्या खरेदी आणि पासिंग मद्ये तब्बल अडीच पटीने वाढ झाली असून फोर व्हीलर च्या विक्री आणि पासिंग मध्ये ही विक्रमी वाढ झाल्याचे चित्र आहे. एकूणच केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये उलाढाल वाढल्याचं दिसत आहे. कोल्हापूरसह राज्य भरातील वाहन बाजार ही त्याला अपवाद राहिलेला नाही. वाहन क्षेत्रात मागील तीन ते चार वर्षातील सर्वात चांगली स्थिती निर्माण झाल्याने या क्षेत्राशी संबंधित व्यवसायिकांना समाधान व्यक्त केलं आहे.
