17 वर्षापासून सुरु असलेल्या खटल्याचा आज निकाल, एकनाथ शिंदेंसह उद्धव ठाकरे दोघेही आरोपी..
2009 च्या कथित CD प्रकरणापासून सुरू असलेल्या या खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 4 आरोपी आहेत. दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी दाखल केलेल्या खटल्यात 20 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. या केसचा आज निकाल आहे.

17 वर्षांपासून सुरू असलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज अंतिम निकाल आहे. 2009 च्या कथित CD प्रकरणापासून सुरू असलेल्या या खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 4 आरोपी आहेत. दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी दाखल केलेल्या खटल्यात 20 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे VCद्वारे जबाब नोंदवण्यात आला. सर्व आरोप खोटे असल्याचे युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने सर्व आरोपींची कलम 313 अंतर्गत जवाब नोंदवत प्रक्रिया पूर्ण केली आहे. आज या प्रकरणात निकाल आहे. कोर्ट निकाल नक्की काय देते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोपी आहेत.
निकालावेळी उद्धव ठाकरे VCद्वारे उपस्थित राहणार असल्याची त्यांचे वकील जयेश वाणी यांची माहिती आहे. इतर आरोपीही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे सध्या दुष्काळाच्या दाैऱ्यावर आहेत. अकोला, वाशिम जिल्ह्यात ते दुष्काळाची पाहणी करणार आहेत. 17 वर्षांच्या या खटल्यात न्यायालय काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष आहे.
या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. नक्की काय निकाल कोर्ट देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण यात थेट आरोपी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. धनुष्यबाण चिन्ह आज एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला. सध्या शिवसेना शिंदे गटाचा युक्तीवाद सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून काैल युक्तीवाद करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. अजून काही युक्तीवाद शिल्लक आहेत. चिन्ह गोठवण्यावर भाष्य करताना काैल दिसले. ही मागणी चुकीची असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
