नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना ‘नो एंट्री’ – विश्व हिंदू परिषदेची सूचना
फक्त हिंदूना प्रवेश द्या, मुस्लिमांना एंट्री नको अशी सूचना देण्यात आली आहे. गरबा उत्सवासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड नीट तपासा, मगच लोकांना प्रवेश द्या असेही सांगण्यात आले आहे.

देवीचा, शक्तीचा उत्सव असलेला नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. सोमवार 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार असून घरोघरी घट बसतील, देवीची आराधा करण्यात येईल. सणा-सुदीच्या या माहोलमध्ये नवरात्रोत्सवात गरब्याचेही आयोजन करण्यात येते. लहानापांसून मोठ्यांपप्यंत अनेक जण यात उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र याच नवरात्रोत्सवानिमित्त एक महत्वाची अपेडट समोर आली आहे. नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
गरब्यासाठी प्रवेश देताना आधार कार्ड तपासून मगच प्रवेश देण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे. मुस्लिम तरूण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे. बजरंग दल आणि विहिंपचे कार्यकर्त्यांची यावर नजर असणार आहे.
विहिंपकडून मोठा इशारा
नवरात्रोत्सवाच्या काळात ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर विहिंपने नागपूरमधील गरबा आयोजकांना या सूचना दिल्या आहेत. तिथे फक्त हिंदूना प्रवेश द्या, मुस्लिमांना एंट्री नको अशी सूचना देण्यात आली आहे. गरबा उत्सवासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड नीट तपासा, मगच लोकांना प्रवेश द्या असेही सांगण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा आहे. नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदूच्या गरबा उत्सवात काही मुस्लिम तरूण लपून प्रवेश करतात, गरबा खेळतात असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना ( मुस्लिम तरूणांना) प्रवेश देऊ नये अशी मागणी विहिंपने केली आहे. येत्या काळात सर्व ॲक्टिव्हिटीजवर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असणार आहेत.
जर गरबा उत्सवात एखाद्या मुस्लिम तरूणाने प्रवेश घेतला तर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करा किंवा आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशाराही विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. त्यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन, पोलिसांना सूचना दिल्या जाणार आहेत, तसेच विनंती पत्रही दिले जाणार असल्याचे समजते.
