AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: भर रस्त्यावर मुंगूस-नागाच्या तुंबळ लढाईचा थरार, झुंज पाहण्यासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबली

मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे जानी दुश्मन समजले जातात.

VIDEO: भर रस्त्यावर मुंगूस-नागाच्या तुंबळ लढाईचा थरार, झुंज पाहण्यासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबली
| Updated on: Apr 03, 2021 | 6:10 PM
Share

बुलडाणा : मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे जानी दुश्मन समजले जातात. अन्नसाखळीतील हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणारच यात शंका नाही. अशाच एका झुंजीचा थरार सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड नागरे रस्त्यावर पाहायला मिळालाय (Video of Fight between Snake and Mongoose in Buldhana).

रस्त्याच्या मधोमध कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. विशेष म्हणजे हा झुंजीचा थरार पाहून रस्त्यावरील वाहतूकही काही काळ थांबली आणि ही लढाई पाहू लागली. या लढाईतील मुंगुस तसं लहान दिसत होतं आणि नाग मात्र चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगसाने नागाला जेरीस आणलं. हे पाहून रस्त्यावरील नागरिकांनीही तोंडात बोट घातलं आणि मुंगसाच्या शिकारी कौशल्याचं कौतुक केलं.

मुंगसाकडून अनेकदा नागाच्या तोंडावर हल्ला करत चावे

विशेष म्हणजे मुंगुस आणि नागाची ही लढाई अजिबात एकतर्फी झाली नाही. मुंगसाने अनेकदा नागाच्या तोंडावर हल्ला करत चावे घेतले, मात्र यावर प्रत्युत्तर म्हणून नागानेही मुंगसाला आपला फणा दाखवत आव्हान दिले आणि दंश करण्याचा प्रयत्न केला. एकदा तर या नागाने मुंगसाला अक्षरशः पिटाळून लावले. मात्र, हार मानेल तो मुंगुस कसला.

शेवटी मुंगसाने नागाचा फडशा पाडून विजय मिळवलाच

काहीशी माघार घेऊन हे मुंगुस पुन्हा नागावर चाल करुन गेलं. असा प्रकार 3-4 वेळा घडला. मात्र, प्रत्येक हल्ल्यात मुंगसाने नागाला अधिक जखमी करत हतबल केलं. शेवटी मुंगसाने या नागाचा फडशा पाडून विजय मिळवलाच. उपस्थितांनी ही मुंगुस-नागाची झुंज मोबाईलमध्येही टिपली.

झुंजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. बुलडाणा जिल्ह्यातील सावखेड नागरे गावाजवळ भररस्त्यावर अचानक नाग आला. त्याचवेळी समोरून मुंगूस आले आणि दोघांमध्ये शत्रुत्वानुसार लढाई झाली. दोघांनीही आपले शक्ती प्रदर्शन करीत एकमेकांवर हल्ला चढविला. कधी साप मुंगसाला तर कधी मुंगूस सापावर हल्ला चढवायचा.

ही लढाई पाहण्यासाठी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बघ्यांची गर्दी

दुपारी साधारण साडेतीन वाजल्यापासून तब्बल 20 मिनिटं ही लढाई सुरूच होती. विशेष म्हणजे रस्त्यावर लढाई असल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्यावर बघ्यांची गर्दी सुद्धा यावेळी जमली होती. मात्र या दोघांनाही इतरांचे काहीच देणेघेणे नव्हते. दोघंही लढाईत मग्न होते. अखेर मुंगूस आणि सापाच्या या चित्तथरारक लढाईत मुंगसाने विजय प्राप्त करत सापाचा फडशा पाडला.

हेही वाचा :

PHOTOS : ‘दंश केल्यावर पाणीही मागू देत नाही’, ‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक विषारी साप

VIDEO | मुंबईत बीकेसीजवळ साडेचार फुटी नाग सापडला, सुटकेचा थरार कॅमेरात कैद

VIDEO | झोपायच्या तयारीत असताना कुटुंबाला नागोबाचं दर्शन, रात्र घराबाहेर काढण्याची वेळ

व्हिडीओ पाहा :

Video of Fight between Snake and Mongoose in Buldhana

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.