धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप; विजय वडेट्टीवार म्हणतात…

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावर काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. (vijay wadettiwar on Dhananjay Munde Rape Case)

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप; विजय वडेट्टीवार म्हणतात...
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 8:45 PM

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावर काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला. मी काही प्रवक्ता नाही, असं सांगत विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर बोलणं टाळलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (vijay wadettiwar on Dhananjay Munde Rape Case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. त्यावर पुन्हा एकदा काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धाराशिव किंवा संभाजीनगर काहीही म्हटलं तरी त्याचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. यातून फआर मोठा बदल होणार नाही. तो विषय अजून अजेंड्यावर नाही. कॅबिनेटमध्येही आला नाही. तसा विषय आला की बघू, असं वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालणार. प्रत्येक पक्षाची भूमिका असते, त्यानुसार तो भूमिका मांडत असतो. विरोधकही आपली भूमिका मांडत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

लोकलबाबत बुधवारी सुनावणी

मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यात काही निर्णय येऊ शकतो. कोरोना संक्रमण वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे त्यावर न्यायालय निर्णय देईल. त्यानंतर सरकार निर्णय जाहीर करेल, असं ते म्हणाले.

गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून पूर्ववत सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतलीय. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर मानली जातेय. कोरोनाचा धोका पाहता नव्या वर्षातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती. (vijay wadettiwar on Dhananjay Munde Rape Case)

संबंधित बातम्या:

लोकल सुरू करण्याचा निर्णय ‘या’ आठवड्यात होणार; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(vijay wadettiwar on Dhananjay Munde Rape Case)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.